लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: गर्दीचे ठिकाण असलेल्या ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पदपथावर बेकायदा लोखंडी शेड उभारण्यात आली आहे. या बेकायदा शेडमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. पानटपरी शेजारी असलेल्या या शेडचा वापर धुम्रपानासाठी होत असून या शेडविरोधात तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. या स्थानकालगतच्या रस्त्यावर सॅटिस पुलाच्या उभारणीचे काम सुरु आहे. यामुळे आधीच वाहतूकीसाठी तसेच नागरिकांना चालण्यासाठी रस्ते आणि पदपथ अपुरे पडत आहेत. असे असतानाच, स्थानकाजवळील पदपथावर बेकायदा लोखंडी शेड उभारण्यात आली आहे. या बेकायदा शेडमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. या संदर्भात ॲड. समीर देशपांडे यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

हेही वाचा…. ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ‘पैसे भराआणि वाहने उभी करा’ योजनेला प्रारंभ

ठाणे पूर्व स्थानकाजवळील पदपथावर कायमस्वरुपी लोखंडी शेड उभारून पदपथ बंद करण्यात आला आहे. आधीच कुठल्याही नियम नियमावलीचा विचार पदपथांची उभारणी करण्यात येत आहे. त्यातच त्यावर कायमस्वरुपी बांधकाम करणे, हे सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पदपथावर शेड उभारणे गैर असून या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याने हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी देशपांडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens allege that there is an illegal iron shed on the footpath near thane east railway station dvr