ठाणे- सिंधु संस्कृतीच्या शोधाला १०० वर्षे पूर्ण होत आहे. या संस्कृतीचे शहरी नियोजन, संस्कृती, कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आताच्या पिढीला मिळावा तसेच सिंधु संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडावे या दृष्टीकोनातून ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधु संस्कृतीचे प्रदर्शन उभारले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरात उभारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंभर वर्षापूर्वी हडप्पा, मोहेंजो-दारो,धोलाविरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडले. ते खरतरं ५ हजार वर्षापूर्वीचे होते. त्याकाळात कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगररचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणे यात आढळून आली. घराची रचना, स्नानगृहे, विटांचे फलाट, संरक्षण भिंती, तटबंदी, इमारतीची रचना अशा अवशेषांचा समावेश होता. या सिंधु संस्कृतीचे बद्दल आजच्या पिढली माहिती मिळावी तसेच याचे दर्शन नागरिकांना व्हावे यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशी – बेडेकर कला, वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सिंधू-सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १३ ते १९ जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत खुले असणार आहे. डॉ. महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प उभारण्यामध्ये २१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते.

हेही वाचा – महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या

ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी या आधी कधीच मातीत हात घातला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. हा प्रकल्प साकारताना, विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या. पाच हजार वर्षापूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी त्याकाळात केल्या जात होत्या. या गोष्टीचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला. – सदाशिव कुलकर्णी, ज्येष्ठ कलाकार

आम्हला जेव्हा सिंधू संकृती हा प्रकल्प उभायचा आहे, याबाबत सांगितले. त्यांची परिपूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर, कुलकर्णी सरांनी आमचा या प्रकल्पासाठी एक वर्ग घेतला. प्रकल्प साकारण्यापूर्वी त्याविषयाचा संदर्भ ग्रंथ शोधून संस्कृती नेमकी कशी होती, याचा अभ्यास केला. मग, ज्या गोष्टी साकारायच्या आहेत, त्याचे संदर्भ शोधून काढले. यासर्व गोष्टींचे योग्य नियोजन करुन १९ डिसेंबरपासून प्रत्यक्ष प्रकल्प साकारण्याचे काम सुरु केले. हा प्रकल्प उभारणे माझ्यासाठी संधी होती, यातून मला खूप काही शिकायला मिळाले. केवळ ही एक प्रतिकृती नसून हा अभ्यासाचा विषय आहे. – रागिनी तारे, विद्यार्थी

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासाह प्रत्यक्ष ज्ञान मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे, असे मला वाटते यासाठी हा प्रकल्प उभारण्याची संकल्पना पुढे आली. सदाशिव कुलकर्णी यांचे हा प्रकल्प उभारण्यात मोलाचे सहकार्य लाभले. – महेश बेडेकर

हेही वाचा – Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना

सिंधु संस्कृतीच्या माहितीसाठी क्यू आर कोडची व्यवस्था

हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या संस्कृतीची पूर्णपणे माहिती मिळावी यासाठी प्रवेशद्वारावर ‘क्यू आर कोड’ ठेवण्यात आला आहे. हा क्यू आर कोड इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना या संस्कृती विषयीची माहिती ध्वनी स्वरुपात उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनाच्या समारोपा दिवशी म्हणजे १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ साईश्रुती भट्ट यांचे ‘मॅजेस्टिक इंडस: इंट्रोडक्शन आणि प्रात्यक्षिक’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens of thane will have a glimpse of indus culture exhibition of indus culture at joshi bedekar college ssb