नागरिकांकडून कचरा फेकण्याच्या प्रकारामुळे तलावाचे डबके
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरामध्ये असलेल्या गणेश विसर्जन तलावाला सध्या कचराभूमीची अवकळा आली आहे. परिसरातील नागरिकांनी त्या तलावाची कचराकुंडी बनवून टाकली आहे। निर्माल्य, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या आणि कचरा तलावामध्ये फेकल्यामुळे त्याची एका मोठय़ा डबक्यासारखी अवस्था झाली आहे. मे २०१५ मध्ये या तलावाचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करून त्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. तलावाच्या चौफेर कठडा बांधून विसर्जनासाठी पायऱ्यांचा घाट तयार करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांत तलावाची पार रया गेली आहे.
कल्याण पूर्वेकडच्या या तलावाचे नाव गणेश तलाव असले तरी मंगलमूर्तीच्या लौकिकास साजेसे इथे काहीच नाही. उलट निर्माल्य आणि परिसरातील नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे तलावाचे मोठय़ा गटारात रूपांतर झाले आहे. गणेशोत्सवात येथे विसर्जन होते. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची तकलादू स्वच्छता मोहीम राबवली जाते. मात्र वर्षभर कचराकुंडी म्हणूनच याचा वापर होतो. सध्या सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जात असताना या तलावाकडे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे.
कल्याण पूर्व विभागात विठ्ठलवाडी स्थानकाजवळच पुणे लिंक रोडलगतच गणेश विसर्जन तलाव आहे. तलाव आकाराने लहान असला तरी या भागातील नागरिकांसाठी ते एक विरंगुळ्याचे ठिकाण होते. महापालिकेने २०१५ मध्ये निवडणुकीपूर्वी या तलावाचे सुशोभीकरण केले. त्यामुळे तलावास नवी झळाळी मिळाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये या तलावाची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्यामुळे हा तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. गॅरेज आणि तबेलेवालेही त्यांचा कचरा तर शेजारील इमारतींचे सांडपाणीही थेट तलावात सोडले जात असल्याने तलावाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
लोकप्रतिनिधी गेले कुठे?
मतदारसंघाच्या नव्या रचनेमुळे कल्याण पूर्व विभागास स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. इथून निवडून आलेले आमदार या तलावाच्या सौंदर्यीकरणाकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली आहे. गणेशोत्सवाच्या काळात याच तलावाच्या काठावर मांडव टाकून लोकांचे सत्कार स्वीकारणारे लोकप्रतिनिधी गणेशोत्सव सरला की या तलावाकडे कधी फिरकतही नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
साथीचे रोग पसरण्याची भीती
सध्या सर्वत्र स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे. स्वच्छतेच्या यादीत पुढचा क्रमांक मिळविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकाही विशेष उपक्रम राबवीत आहे. मात्र पूर्वेतील गणेश तलाव परिसरात या स्वच्छता मोहिमेची कोणतीही निशाणी नाही. स्वच्छ सर्वेक्षणानिमित्ताने का होईना, तलावाचा उद्धार व्हावा, अशी अपेक्षा जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत.