ग्रामीण भागातील पारंपरिक जत्रा आणि नव्या महानगरीय जीवनशैलीतील विंडो शॉपिंगचे केंद्र ठरलेल्या मॉल- मल्टिप्लेक्स संस्कृतीचे मिश्रण डोंबिवलीतील आगरी महोत्सवात पाहायला मिळते. जत्रांमधील काहीशा अस्ताव्यस्त बाजाराबरोबरच अगदी टापटीप, पोशाखी वृत्तीला मानवेल अशी नेटकी दुकाने हल्ली आगरी महोत्सवात पाहायला मिळतात. विविध प्रकारचे खेळ, अस्सल गावरान पदार्थानी सजलेली सामिष उपाहारगृहे, शोभिवंत तसेच ग्राहकोपयोगी दुकाने असे अगदी सर्व काही आगरी महोत्सवाच्या मांडवात पाहायला मिळते. समाजातील वयोवृद्ध तसेच मोबाइलद्वारे एकमेकांचे सेल्फी काढण्यात मग्न असणारी तरुणाई असा सर्व थरांतील आगरी समाज मोठय़ा संख्येने या महोत्सवात येतोच, शिवाय शहरातील उत्सवप्रिय नागरिकही आवर्जून हजेरी लावतात.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2015 रोजी प्रकाशित
समाजाचा नव्हे शहराचा जत्रोत्सव
आगरी समाज मोठय़ा संख्येने या महोत्सवात येतोच, शिवाय शहरातील उत्सवप्रिय नागरिकही आवर्जून हजेरी लावतात.
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 09-12-2015 at 02:25 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City festival