लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : घरातून पाळीव श्वानाला बाहेर काढल्यानंतर त्याचा फिरण्याचा मार्ग लोखंडी प्रवेशद्वार लावून येथील निळजे भागातील लोढा हेवन मधील एका कुटुंबियांनी बंद केला. या विषयावरून पाळीव श्वानाचे विकासक असलेले मालक आणि प्रवेशद्वार बंद करणाऱ्या कुटुंबियांमध्ये वाद होऊन पाळीव श्वानाचा मालकालाइतर कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आहे.

मागील रविवारी निळजे भागातील चंद्रेश व्हिला लोढा हेवन भागातील सोसायटीत हा प्रकार संध्याकाळच्या वेळेत घडला आहे. पाळीव श्वानाचे मालक विकासक मनोज छोटुराम योगी (४३) यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी चंद्रेश व्हिला सोसायटीतील रहिवासी आरोपी अनुराधा संतोष तिवारी (४७), कृतिका संतोष तिवारी (२१) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत ठाकुरवाडीमध्ये शाळेच्या आरक्षणावर ‘महारेरा’ नोंदणीची बेकायदा इमारत

पोलिसांनी सांगितले, विकासक मनोज योगी यांचा पाळीव श्वान आहे. ते आपल्या श्वानाला सकाळ, संध्याकाळ सोसायटी परिसरात फिरण्यासाठी नेतात. या श्वानाच्या भटकण्याचा त्रास होत असल्याने चंद्रेश सोसायटीतील आरोपी अनुराधा तिवारी यांनी श्वान सोसायटीतून बाहेर पडल्यावर ज्या मार्गाने जातो त्या मार्गावर लोखंडी प्रवेशद्वार उभे केले. श्वान त्या भागातून जाणार नाही अशी व्यवस्था केली.

सोसायटीतून श्वानाला बाहेर पडण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने तक्रारदार मनोज यांच्या पत्नीने आरोपी अनुराधा यांना प्रवेशद्वार काढून टाकण्यास सांगितले. आरोपींनी ते प्रवेशद्वार काढले नाही. सोसायटीने आरोपींना पत्र देऊन प्रवेशद्वार काढण्यास सांगितले. तरीही कार्यवाही झाली नाही. अखेर मनोज योगी, सोसायटीतील इतर सदस्य यांनी एकत्र येऊन आरोपी तिवारी कुटुंबियांनी बंद केलेल्या सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वार काढून टाकले. त्याचा राग तिवारी कुटुंबियांना आला त्यांनी विकासक योगी यांना शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. अनुराधाने विकासक योगी यांच्या पायावर वीट फेकून दुखापत केली आहे. कल्याण, डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमध्ये पाळीव श्वानांच्या विषयाची तक्रारी वाढू लागल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत.