ठाणे : शहरातील बहुचर्चित समूह विकास योजनेचा (क्लस्टर) शुभारंभ येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार असून अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर इतके आहे. अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली. या ४५ आराखडय़ांपैकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक १२ मधील नागरी पुनरुत्थान योजना क्रमांक १ आणि २ ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Chief Minister Eknath shinde understanding of independent parties in Thane print politics news
ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के

येथील अंतिम भूखंड क्रमांक १८६/ १८७ या वरील ७७५३ चौ.मी. क्षेत्रफळावरील भूखंडावर आणि त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक २२ लगतचा भूखंड क्रमांक एफ – ३ या ठिकाणी १९२७५ चौ.मी. जागेवर योजनेच्या कामाला सुरुवात होणार असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले असून त्याचेही उद्घाटन यावेळी होणार आहे. यानिमित्ताने देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठय़ा, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समुह विकास योजना (क्लस्टर) मूर्तरूप घेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

योजनेतील सुविधा..

  • अनधिकृत इमारतीसह वसाहतीच्या टाऊनशिप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प
  • मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित व सुनियोजित संकुलामध्ये घर
  • पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य ३२३ चौ. फूट मालकी हक्काचे घर
  • प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा
  • प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था
  • पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
  • अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त व दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा
  • पाणीपुरवठा, मल व जलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा
  • पुनर्विकसित टाऊनशिप आराखडय़ामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदी नागरी सुविधांचा समावेश