मुंबई : कल्याण येथील बालिकेची हत्या व अत्याचार प्रकरणीच्या खटल्यात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले. याप्रकरणी आरोपीवर एक महिन्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Kalyan Rape and Murder: विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी; मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन

या दुर्दैवी मुलीच्या कुटुंबियांनी मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित मिश्रा व कल्याण येथील आमदार सुलभा गायकवाड यांच्यसह फडणवीस यांची शनिवारी भेट घेतली. याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा होईल व त्यांची जामीनावर सुटका होणार नाही, याची दक्षता पोलिस अधिकारी घेतील, असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले.

दरम्यान, विशाल गवळी हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. येथील माजी आमदारांनी त्याला वेळोवेळी पाठबळ देऊन सोडवले, असा आरोप माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केला. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळले असून गायकवाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. विशाल गवळी यांचा भाजपशी काडीचाही संबंध नाही. ते भाजपचे साधे किंवा सक्रिय सदस्य नाहीत, असे भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी माध्यामांना सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis appoint advocate ujjwal nikam appointed to represent kalyan minor rape murder case