कल्याण- कल्याण शहर हे शहरी, ग्रामीण पट्ट्यात विभागले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार रुग्ण सेवा मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने दोन सर्वोपचारी रुग्णालये उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. या रुग्णालयांना शासन सर्वेातपरी आर्थिक साहाय्य करील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे दिले.

हेही वाचा >>> ठाणे : आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे शहराच्या विविध भागात विकास कामे उभी केली आहेत. प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील विद्युत रोषणाई, सुशोभिकरण, आंबिवली, वाडेघर येथील मलशुध्दिकरण प्रकल्पांचे लोकार्पण, दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप, झोपडपट्टी योजनेतील पात्र लाभार्थींना हक्काची घरे, केेडीएमटीमधील स्थायी कर्मचाऱ्यांना कायम पदस्थापनेचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मैदानावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपील पाटील, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आ. गणपत गायकवाड, आ. विश्वनाथ भोईर, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आ. नरेंद्र पवार, माजी महापौर विनिता राणे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे उपस्थित होते.

सर्वोपचारी रुग्णालये

कल्याण ऐतिहासिक वारसा जपणारे शहर आहे. या शहराचा वारसा जपण्यासाठी कल्याणमधील अधिकाधिक विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कल्याण शहर परिसराचे वाढते नागरीकरण विचारात घेऊन पालिकेने कल्याण पूर्व, पश्चिमेसाठी दोन सर्वोपचारी रुग्णालयांचा आराखडा तयार करावा. या रुग्णालयांमुळे नागरिकांना उपचारासाठी इतर शहरात जाण्याची गरज लागणार नाही. या रुग्णालयांच्या उभारणीसाठी सर्वोतपरी अर्थसाहाय्य करण्यास शासन तयार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

एक हजार कोटीची मागणी

कल्याण डोंबिवली शहर परिसरातील नागरिकरणाचा विचार करुन या भागातील विकास कामांसाठी एक हजार कोटी रुपयांची गरज असल्याची मागणी खा. शिंदे यांनी केली. या विषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राचा एक बृहत आराखडा तयार करा. या माध्यमातून विविध विकास कामे हाती घेऊन या भागातील वाहन कोंडी सोडविण्यावर सर्वाधिक भर दिला जाईल. कल्याण पश्चिमेतील रस्ते मार्गी लावण्यासाठी ५०० कोटीचा आराखडा शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाचा विचार करण्याची मागणी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाचा विचार करण्याचे आश्वासन दिले.

मेट्रो प्रकल्प

भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प विहित वेळेत मार्गी लागावा. यासाठी या प्रकल्पाच्या निविदा काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. बिर्ला महाविद्यालय परिसरातून हा मार्ग नेता येईल यादृष्टीने आराखडा करण्याच्या सूचना केल्या आहेत. काळू धरणासाठी वन विभागाला ४१० एकर जमीन हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या धरणातून मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. भिवंडीलीतील वराळा तलाव अमृत योजनेतील सुशोभित केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. खड्डे मुक्त एमएमआरडीए क्षेत्र योजना प्रभावीपणे अंमलात आणली जाईल. या परिसराचा चौफर विकास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पालिकेचे प्रकल्प

२०४९ पर्यंतची लोकसंख्या, गावठाण भागातील वाढती लोकवस्ती विचारात घेऊन वाडेघर येथे २६ दशलक्ष लीटर क्षमतेचे मलशुध्दिकरण केंद्र उभारण्यात आले आहे. २५ कोटी खर्च या प्रकल्पासाठी आला आहे. शहाड, मोहने, टिटवाळा भागातील मलनिस्सारणाचा विचार करुन आंबिवली येथे २१ दशलक्ष लीटर क्षमतेचे मलशुध्दिकरण बांधण्यात आले आहे. २० कोटी खर्च या प्रकल्पासाठी आला आहे. शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

झोपु प्रकल्प

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात एकूण ७२७२ घरे तयार आहेत. यामधील १२६५ घरांचे यापूर्वीच वाटप केले आहे. उर्विरत घरांचे वाटप करण्याचे नियोजन कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यामधील ३९७ सदनिका, ११९ गाळे वाटपासाठी सज्ज होते. झोपु योजनेतील पात्र लाभार्थींना २० सदनिका, ४८ गाळे, प्रकल्पग्रस्त लाभार्थींना २८७ सदनिका, ७१ गाळे वाटप करण्यात आले. दत्तनगर मधील अपात्र ९० लाभार्थींना तात्पुरत्या स्वरुपात घरे मुख्यमंत्र्याच्या हस्ते वाटप करण्यात आली.

प्रबोधनकार ठाकरे सरोवर प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील विद्युत रोषणाई, सुभोभिकरण स्मार्ट सिटी प्रकल्पातून करण्यात आले. या प्रकल्पासाठी १९ कोटी खर्च आला आहे. एक पर्यटन केंद्र म्हणून हे स्थळ विकसित झाले आहे असे आयुक्त डॉ. दांगडे यांनी सांगितले.

Story img Loader