ठाणे : मी गरीब कुटुंबातील आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी या कल्याणकारी योजना आणल्या. परंतु काही सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे ज्यांनी योजनेत खोडा घातला आहे, त्यांना जोडा दाखविण्याची वेळ आली आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

हेही वाचा >>> ठाण्याच्या जागेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच, शहरभर लागले ‘दादाचं काम बोलतंय’चे फलक

कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. हे सरकार कोणावर भेदभाव करत नाही. मी गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. या योजनांचा प्रत्येकाला लाभ होत आहे. काही सावत्र भाऊ योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. ज्यांनी या योजनेत खोडा घातला आहे. त्यांना जोडा दाखविण्याची वेळ आली आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

डाॅ. बबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असे खोटे सांगितले गेले. त्यावेळी मुस्लिम, ख्रिश्चन, दलितांना घाबरवून त्यांची मते विरोधकांनी मिळविली होती. परंतु फसवणूक एकदाच होऊ शकते. पुन्हा पुन्हा फसवणूक होऊ शकत नाही. नागरिकांनी जागरूक होऊन मतदान करण्याची गरज आहे असे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प बंद पडले. अनेक प्रकल्पांना नकार देण्यात आला. परंतु आमचे सरकार आल्यावर प्रकल्प सुरू झाले असेही शिंदे म्हणाले.