ठाणे – छत्रपती शाहू महाराज यांचा कोल्हापूरमध्ये पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत होते. त्याकरिता मुख्यमंत्री एका हॉटेलमध्ये शंभर कोटी रुपये घेऊन बसले होते. असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी ठाण्यातील सभेत केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. घटनाबाह्य मुख्यमंत्री मोदींच्या सहावासात गेल्यापासून खोट बोलायचे, रेटून बोलायचे असे वागत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुलाला ठाण्यात उभे करायला पाहिजे होते. ज्या ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे तिथे मशालीचा विजय होणार आहे. चोरीचा माल पचणार नाही असे राऊत म्हणाले.

Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

हेही वाचा >>> कल्याणमध्ये नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्या सभा

४ जून नंतर शिंदे पळतील. स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देश सोडावा लागेल. या दोघांचेही पारपत्र जप्त करा. ब्रिटिशांनी लुटला नसेल एवढा देश या लोकांनी दहा वर्षात लुटला आहे . असे राऊत यांनी सांगितले महाराष्ट्रत चित्र बदलत आहे असे राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीच्या देशात ३२० हून अधिक जागा

भाजपा देशात १५० पार करू शकत नाही. इंडिया आघाडीच्या देशात ३२० हून अधिक जागा निवडून येतील. असा विश्वास संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला. आनंद दिघे यांच्यावर तयार करण्यात आलेला खोटा चित्रपट हा त्यांचा अपमान आहे. ठाणेकर अशा व्यक्तींना माफ करणार नाही.असे राऊत यांनी सांगितले.