दादरमधील शिवाजी पार्क मैदानात नियोजित दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय दिला. मुंबई महानगरपालिकेचा या मेळाव्याला परवानगी न देण्याचा निर्णय हा कायदेशीर प्रक्रियेचा उघडउघड दुरुपयोग असल्याचं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली. यानंतर ठाकरे गट समर्थकांनी मुंबईबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला. अशातच रात्री उशीरा ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना होण्याआधी शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी या घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
नक्की वाचा >> “मुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेतला असता तर…”; ठाकरेंना परवानगी मिळाल्यावर शिंदे गटाकडून दावा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा