डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील नागरीकरण होत असलेल्या भागात अधिकाधिक आरोग्य सुविधा देऊन या भागातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. येथे कर्करोग रुग्णालय आणि सूतिकागृहाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे डोंबिवलीतील टिळक रस्त्यावर २०० खाटांचे सूतिकागृह आणि कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे.

हेही वाचा >>> भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची टीका

cancer patients news in marathi
प्रत्येक जिल्ह्यात ‘कर्करोग डे केअर सेंटर’ उभारणार, कर्करोग रुग्णांना दिलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
cheap Ayush Ayurvedic Medicine
देशभरात स्वस्तातील आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
Fill vacant posts of doctors in health department immediately says Health Minister Prakash Abitkar
आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरा- आरोग्यमंत्री
GBS , patients, Government , private hospitals ,
जीबीएस रुग्णांना दिलासा! खासगी रुग्णालयांतील उपचाराच्या खर्चावर सरकारचे नियंत्रण

गेल्या १० वर्षांपासून रखडलेला अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला आहे. यासह मासळी बाजार, शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्याकीय सुविधा आणि इतर विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थितीत होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कळवा शहरांमध्ये अद्यायावत वैद्याकीय सुविधा देऊन गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची खर्चाची तरतूद दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader