ठाणे : ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच, किसननगर येथे आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे अचानक रॅली सोडून हात भाजलेल्या नऊ वर्षीय लहानग्याच्या मदतीला धावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा-वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रथावर उभे होते. प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली. त्यावेळी एक महिला तिच्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चालत असल्याचे शिंदे यांना दिसले. या महिलेच्या कडेवर एक मूल तर जखमी मूल हात पकडून होते. मुलाच्या हाताला गंभीररित्या भाजले होते. महिला त्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि त्या महिलेची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले. शिंदे यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्याच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.

हेही वाचा – कल्याण जवळील नेवाळी गावातील किराणा दुकानात सापडले साडेचार कोटींचे अमली पदार्थ

हेही वाचा – खारेगाव, कळवा भागात वाहतुक बदल

रुद्रांश रोनीत चौधरी असे हात भाजलेल्या मुलाचे नाव आहे. घरात खेळत असताना अचानक हातावर उकळते तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररित्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच शिंदे हे पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले.