ठाणे : काही लोकांना सिनेमा खटकला, काही लोक सिनेमा बघता-बघता उठून गेले. काहींना चित्रपटातील दृश्य आवडली नाहीत, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या मुहूर्त कार्यक्रमात बोलताना केले. आता कोणाला काही आवडो किंवा ना आवडो. कारण, आता फुलफायनल अथोरीटी आपणच आहोत, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य आता कापावे लागणार नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील कोलशेत भागात ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त कार्यक्रम सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात बोलताना ‘धर्मवीर’ या चित्रपट प्रदर्शितदरम्यान घटना सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. धर्मवीर चित्रपट चांगला झाला. सगळ्यांनी मेहनत घेतली. पण, काही लोकांना सिनेमा खटकला, काही लोक सिनेमा बघता-बघता उठून गेले. काहींना चित्रपटातील दृश्य आवडली नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. पण, आता कोणाला काही आवडो या ना आवडो. कारण, आता फुलफायनल अथोरीटी आपणच आहोत, असे सांगत त्यांनी ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य आता कापावे लागणार नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.

हेही वाचा – ठाण्यातील हा आमदार ‘मॉरिशस’मध्ये साकारणार छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय अधिकारी तृणाली महातेकर निलंबित, रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरण

त्यावेळेस घुसमट होत होती. इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या. प्रवीण तरडे यांनाही ते आवडले नव्हते. कलाकार मंडळी मुडी असतात. त्यांना सांगावे लागले की, काहींना अर्जीण झाले आहे. आता त्या लोकांना वर्षभरापूर्वी गोळी दिली आहे. आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले असल्यामुळे कधी छोटी आणि कधी मोठी गोळी द्यायची हे माहीत होते. कधी इंजेक्शन पण द्यावे लागते तर कधी ऑपरेशन पण करावे लागते. मी डाॅक्टर नाही पण, ऑपरेशन केले, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दिघे यांचे व्यक्तीमत्त्व चित्रपटाच्या एक ते दोन भागांतून दाखवणे शक्य नसून आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde made a statement about dharmaveer 2 movie he said that the scenes in the film will not have to be cut ssb