कल्याण- कल्याण मधील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी कल्याणमध्ये येत आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

कल्याण मधील काळा तलावामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. धावते विजेचे कारंजे, पाणतळ अशा सुविधा काळा तलावात उभारण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
What devendra Fadnavis says to eknath shinde
CM Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Ladki Bahin Yojana Updates By Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार? उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंना सवाल
eknath shinde took oath as deputy cm with ajit pawar and devendra fadnavis cm
Eknath Shinde: शपथविधीच्या दोन तास आधी एकनाथ शिंदे झाले राजी; पडद्यामागे नेमकं असं काय घडलं?
Devendra Fadnavis and Eknath Shinde Meet
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!
Devendra Fadnavis and Eknath Shinde Meet
मोठी बातमी! सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? देवेंद्र फडणवीस तातडीने ‘वर्षा’वर एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बैठकीत काय निर्णय होणार?

हेही वाचा >>> “नव उद्योजकांना दिशा देण्यासाठी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क’सारख्या संस्थांची गरज”; उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

प्रबोधनकार ठाकरे सरोवर म्हणून तलावाचे नामकरण केले जाणार आहे. विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्पात घरे देण्याचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. वाडेघर आणि आंबिवली भागात वाढत्या नागरीकरणाचा विचार करुन दोन नवीन मल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

जाहीर सभेचा कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मैदानात संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत ज्या फेरीवाल्यांना कर्ज मंजूर झाले आहेत. अशा १९४ फेरीवाल्यांना साहाय्यक आयुक्तांनी कार्यक्रम स्थळी घेऊन हजर राहण्याचे आदेश प्रभागस्तरावर काढण्यात आले आहेत.

Story img Loader