अंबरनाथ – अंबरनाथ शहर आता वेगाने प्रगती करत आहे. शहरात अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहत असून हे शहर आता देशातील अनेक मोठ मोठ्या शहरांबरोबर स्पर्धा करत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या शहराच्या विकासासाठी गेल्या काही महिन्यातच तब्बल ७७५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यातही  याच पद्धतीने शहरांच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल  दरम्यान केले.

हेही वाचा >>> मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे मेगा टेक्स्टटाईल्स पार्क मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील विकास गतीने होत असून त्यासाठी त्यांचे आभारही एकनाथ शिंदे यांनी मानले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शिव मंदिरात भगवान शंकराची पूजा करून मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या रुद्राक्षांच्या पिंडीचे दर्शन घेत महाआरती केली. या महाआरतीकरिता वाराणसीहून पंडित उपस्थित होते.

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणार अंबरनाथ शिव मंदिर फेस्टीव्हल हा अंबरनाथचे केवळ देशभरातच नव्हे तर जागतिक स्तरावर नाव मोठे करत आहे. तसेच अंबरनाथ मध्ये वेगाने होत असलेली विकासकामे पाहता येत्या काळात प्रत्येक जण ‘ क्या बात अंबरनाथ ‘ असे आवर्जून म्हणेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी अंबरनाथच्या विकास पर्वाचा गौरव केला.  तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना हा भव्य महोत्सव राबविल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच अमित त्रिवेदी यांच्यासह सर्व उपस्थित कलाकारांचा  मुख्यमंत्री यांनी सत्कार करत त्यांनाही शुभेच्छा दिल्या.  अंबरनाथ शहराचा विकास हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून येत्या काळातही अंबरनाथ करांसाठी अनेक मूलभूत सोयी सुविधा, विकास प्रकल्प उपलब्ध करून देत या महोत्सवा सारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातील, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासात पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ हे मोलाची भूमिका बजावत आहे, असे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगत त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा >>> शहापूर: शेतकरी मोर्चात एकाचा मृत्यू

दुसरा दिवस हाऊसफुल्ल फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी अमित त्रिवेदी यांना ऐकण्यासाठी रसिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. गर्दीचा नवा उच्चांक  यावेळी पहायला  मिळाला. त्रिवेदी यांनी या कार्यक्रमाची सुरुवात नमो नमो हे शंकरा या गाण्याने करत सर्व उपस्थित रसिकांमध्ये उत्साह जागवला. तर यानंतर  जज्बा, दोस्ती, जयकाल महाकाल, नैना दा क्या कसूर गुजराती गाणे – अंबे मा, शौक, ये फितूर, इकतार, मे परेशा, एक कुडी, जाने बलमा घोडे पे क्यू सवार है,  लव्ह यू जिंदगी, पशमिनो धागो के संग, मोंता रे, चौढरी, शुभारंभ, नवराई माझी लाडाची, उडता पंजाब यांसारख्या एकाहून एक गाण्यांचे सादरीकरण करत उपस्थितांना खिळवून ठेवले. तर प्रेक्षकांनी विविध गाण्यांवर ताल धरत सादरीकरणाला उत्तम दाद दिली. तर देशातील विविध राज्यातील संस्कृती दर्शविणारी गाणी सादर करत अमित त्रिवेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Story img Loader