बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून उत्तरेत तापमानात घट नोंदवली जात असतानाच ठाणे जिल्ह्यातही गारठा अनुभवायला मिळतो आहे. रविवारी थंडीने मोसमातील नीचांक नोंदवला. त्यानंतर सोमवारीही तापमानात घट पाहायला मिळाली. बदलापूर आणि त्यापल्याड तापमान १० अंशावर होते. तर जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये सरासरी १२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाताळच्या सुट्ट्या आणि थंडीचा अनुभव यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात चांगली थंडी जाणवते आहे. उत्तरेत तापमानात मोठी घट पाहायला मिळाली. तशीच तापमानातील घट ठाणे जिल्ह्यातही नोंदवली गेली. गेल्या आठवड्यापासून तापमानात घट होत असल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी यंदाच्या मोसमातील डिसेंबर महिन्यातील नीचांकी तापमानाची नोंद बदलापुरात झाली होती. बदलापुरात रविवारी ९.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे रविवारी बदलापूर आणि त्यापुढे गारेगार वातावरण अनुभवायला मिळाले.

हेही वाचा: ठाणे : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार काळ्या यादीत; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची कारवाई

शेजारच्या कर्जतमध्येही ९.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर जिल्ह्यातही सरासरी १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सोमवारीही तसाच गारवा जाणवत होता. मात्र तापमानात किंचित वाढ झाली होती. सोमवारी सकाळी जिल्ह्यात सरासरी १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. बदलापुरात सर्वात कमी १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर शेजारच्या कर्जतमध्ये १०. ४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. कल्याण, डोंबिवली, ठाण्यातही तापमानात घट नोंदवण्यात आली.

बदलापूर १०
कर्जत १०.४
कल्याण १२.४