भगवान मंडलिक

कल्याण : देवेंद्र फडणवीस सरकारने डोंबिवली शहरासाठी मंजूर केलेला ४७२ कोटीचा निधी तब्बल अडीच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुला केल्याने या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या शिंदे आणि स्थानिक आमदार तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील वादाला अखेर तिलांजली मिळाली आहे. राज्यात ठाकरे सरकार येताच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी रोखला असा आरोप यापूर्वी चव्हाण यांनी अनेकदा केला आहे. डोंबिवली शहराचे रस्त्यांच्या माध्यमातून कायापालट करण्याचे डोंबिवली विधानसभेचे भाजप आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वप्न त्यामुळे भंग पावले. ठाकरे सरकारने हा निधी खुला करावा म्हणून अडीच वर्ष रवींद्र चव्हाण आटोकाट प्रयत्न करत होते. परंतु, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण हा निधी खुला करत नसल्याने या मुद्द्यावरून शिंदे चव्हाण वाद वाढू लागला होता.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम

हेही वाचा… विश्लेषण: डोंबिवली का बनली आहे खड्डेनगरी? चूक कोणाची? जबाबदारी कोणाची?

अखेर दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात दिलजमाई झाली. आणि ४७२ कोटीचा डोंबिवलीसाठी यापूर्वी मंजूर करुन घेण्यात आलेला रस्ते कामांचा निधी कल्याण शहरासाठीही खर्च करण्याचा निर्णय होऊन तीन वर्षापासून सुरू असलेल्या खड्डे निधी शीतयुध्दावर पडदा टाकण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिलजमाईला यश आले आहे.

हेही वाचा… नागरी समस्याग्रस्त डोंबिवलीतील नागरिकांचे फडके रस्त्यावर आंदोलन

डोंबिवली विधानसभा क्षेत्र हे आ. चव्हाण यांचे कार्यक्षेत्र असले तरी या भागात विकासकामे फक्त आम्हीच केली. आम्ही रस्तेच काय, विकास कामांची जबाबदारी झटकत नाहीत म्हणून काही राजकीय मंडळी डंका पिटत असल्याने मंत्री चव्हाण अस्वस्थ आहेत. कडोंमपात आपल्या मर्जीतले आयुक्त, शहर अभियंता शिंदे गटाने आणून ठेवले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री चव्हाण यांना दिले तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यावर भाजपचा वरचष्मा होईल, अशी भीती शिंदे गटाला असल्याने मंत्री चव्हाण यांना ठाण्याच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळीच्या सुरुवातीला ‘Good News’; रस्त्यांच्या कामांसाठी ४४३ कोटींचा निधी मंजूर

डोंबिवलीत विकास कामे राबवयाची असतील तर कल्याण डोंबिवली पालिकेत हक्काचा विश्वासू अधिकारी पाहिजे म्हणून अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना त्यांच्या रिक्त पदावर घेण्यासाठी मंत्री चव्हाण यांनी प्रयत्न केला. तो मुख्यमंत्री पुत्राने हाणून पाडला अशी चर्चा होती. मर्जीतला अधिकारी नसल्याने कडोंमपावर वर्चस्व नाही, ड़ोंबिवलीत खड्डे, रस्ते दुरवस्था यामुळे सतत लक्ष्य व्हावे लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अनुभवी अधीक्षक अभियंता आणण्याचा प्रयत्न मंत्री चव्हाण यांनी चालविला होता. याची कुणकुण काही राजकीय मंडळींना लागताच त्यांनी तात्काळ ठाणे पालिकेतील अतिरिक्त नगर अभियंत्याला घाईघाईने आणून बसविला आणि चव्हाण यांचा प्रस्ताव बारगळला.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : पुण्यात चेंबरची स्वच्छता करताना दोघांचा मृत्यू, राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

शिंदे-चव्हाण यांच्या मधील स्थानिक सुंदोपसुंदी कायम राहिली तर ठाणे जिल्ह्यातील आगामी पालिका निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल हा विचार करुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे-मंत्री चव्हाण यांच्यात दिलजमाई केल्याची चर्चा आहे. दोन वर्षांनी कल्याण लोकसभेसाठी भाजपला बाळासाहेबांची शिवसेनेची मदत लागणार आहे. स्थानिक कुरबुऱी राजकारणावरुन विकास कामे होत नसतील तर नागरिकांना निवडणुकीच्या वेळी आवरणे कठीण होणार आहे याची जाणीव शिंदे-चव्हाण यांना वरिष्ठांनी करुन दिल्याने खड्डे निधी खुला करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाची कामे करुन एकजुटीने राहू असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.

हेही वाचा… तुम्हाला माहितीये का मोती साबण अन् दिवाळीचं नातं कसं जुळलं? हा साबण दिवाळीत वापरण्यास सुरुवात कधी झाली?

कडोंमपा हद्दीत गेल्या तीन वर्षात माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. शिंदे यांच्या प्रयत्नाने एक हजार कोटीची रस्ते, पुलांची कामे मंजूर केली आहेत. त्यात मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातील ४४३ कोटीच्या निधीची भर पडणार असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा कायापालट होईल, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. या निधीचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहा वर्षापूर्वी कडोंमपासाठी जाहिर केलेल्या ६५०० कोटीच्या विकास पॅकेज सारखे होऊ नये, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.

Story img Loader