ठाणे : नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘कोल्ड प्ले’या कॉन्सर्टच्या तिकिटांची दुप्पट ते तिप्पट चढ्या दराने विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. तिकीट विक्रीसाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे चढ्या दराने तिकिटाची विक्री होत असतानाही अनेक जण हे तिकीट खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>> कोल्ड प्ले निमित्त महामुंबईत सज्जतेची आखणी; कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येणारा दहा हजारहून अधिक वाहने

Three gawali brothers from Kalyan East were exiled from Thane Mumbai and Raigad districts for two years
कल्याण पूर्वेतील तीन भाऊ दोन वर्षासाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार
Kalyan Dombivli is free from drunkards ganja users and criminals due to police action at night
रात्रीची मद्यधुंद, तर्र कल्याण-डोंबिवली रस्ते, झुडपांमधून गायब
lift at Dombivli East railway station has been closed for three days
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उदवहन तीन दिवसांपासून बंद, उदवहनला वाहनांचा वेढा
online fraud with Bank officer on name of share trading
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक
Two women fight at Ramnagar police station in Dombivli
डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांमध्ये केसाच्या झिंज्या उपटून मारामारी
Thief who stole passengers belongings in express arrested from Bhiwandi railway station
एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे ऐवज चोरणारा चोरटा भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक
traffic Preparations planned in navi Mumbai for Cold Play event thane news
कोल्ड प्ले निमित्त महामुंबईत सज्जतेची आखणी; कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येणारा दहा हजारहून अधिक वाहने
Thane Municipal corporation will provide land for the construction of eco friendly Ganesh idols thane news
पर्यावरणपुरक गणेश मुर्तीच्या निर्मीतीसाठी पालिका देणार जागा; ठाणे महापालिका प्रशासनाची मुर्तीकारांच्या बैठकीत घोषणा
Manisha Awhale , commissioner , Ulhasnagar,
उल्हासनगरच्या आयुक्तपदी मनीषा आव्हाळे

नवी मुंबई येथील डाॅ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये तीन दिवस ‘कोल्ड प्ले’चे आयोजन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोल्ड प्ले काॅन्सर्टच्या तिकिटांच्या काळा बाजाराविषयी चर्चा रंगल्या होत्या. नवी मुंबईत हा कार्यक्रम असल्याने देशभरातील विविध भागातून तरुण-तरुणी तसेच विदेशी नागरिक नवी मुंबईत येऊ लागले आहेत. तिकीट विक्री पूर्ण झाली असल्याने अनेकांना इच्छा असूनही तिकीट मिळू शकले नाहीत. त्यामुळे आता या तिकिटांची काही जण चढ्या दराने पुनर्विक्री करत असल्याचा प्रकार समोर येत आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा वापर करून या तिकिटांची विक्री केली जात आहे. ‘लाऊंज’ या सर्वात महागड्या तिकिटाचा दर लाखाच्या घरात गेला आहे. त्याची अधिकृत किंमत ३५ हजाराच्या आसपास होती, तर इतर ३ ते ४ हजार रुपयांच्या तिकीट पुनर्विक्री करण्यासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी केली जात होती. इतर आसन व्यवस्थांच्या तिकिटांबाबतीतही अशीच परिस्थिती होती.

नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे तिकिटाच्या काळा बाजाराबाबतची कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. तिकिटाचा काळा बाजार होत असल्याची तक्रार आल्यास कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल. – अमित काळे, उपायुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, नवी मुंबई पोलीस.

Story img Loader