कल्याण : नागरिक विविध प्रकारच्या नागरी समस्यांविषयक तक्रारी घेऊन पालिकेत येतात. अशा नागरिकांच्या नागरी समस्या, अडचणी विषयक म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी खास वेळ राखून ठेवावा. यासाठी भेटीची कार्यालयीन वेळ निश्चित करावी, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी पालिकेतील विभाग प्रमुखांच्या एका बैठकीत दिले. नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून त्या आराखड्यावर प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आयुक्त डाॅ. जाखड यांनी पालिका मुख्यालयातील आपल्या दालनात विभाग प्रमुखांची एक बैठक मंगळवारी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या बैठकीत महापालिकेच्या सर्व सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होतील यादृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्याने काम करावे. याविषयी एकही तक्रार येता कामा नये. अशा सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांना केल्या. आपल्या कार्यालयातील अभिलेखांचे योग्यरितीने वर्गीकरण करावे. आवश्यकता नसलेले अभिलेख योग्य तपासणी करून त्याची पुढील काळात गरज नसेल तर ते योग्य कार्यवाही करून नष्ट करावेत. आवश्यक तेवढे अभिलेख व्यवस्थित जतन करावेत, असे आयुक्त डाॅ. जाखड यांनी सांगितले. कार्यालयात अनावश्यक साहित्य, भंगार राहणार नाही याची काळजी प्रत्येक अधिकाऱ्याने घ्यावी. आपले कार्यालय स्वच्छ सुंदर राहील यादृष्टीने कार्यवाही करावी. कार्यालयातील वातावरण नागरिक स्नेही ठेवण्यात यावे. नागरी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे योग्यरितीने निराकरण करावे. प्रत्येक कामासाठी प्रभागातील अधिकाऱ्यांना मुख्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून उपअभियंता स्तरावर काही प्रमाणात आर्थिक अधिकार द्यावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

हेही वाचा…रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक

कार्यालयात नागरी समस्या, अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयीन कामाप्रमाणे वेळ राखून ठेवावा, अशा सूचना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी केल्या आहेत. अलीकडे नागरिक पालिका प्रभाग कार्यालयात आपल्या नागरी समस्यांविषय तक्रारी घेऊन गेले की बहुतांशी वेळा प्रभागातील अधिकारी, अभियंते पालिका मुख्यालयात बैठकीसाठी गेले आहेत, असे प्रकार अलीकडे खूप वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रभाग कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारुनही तेथील कार्यालयात साहेब आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी बोलविलेल्या बैठकीला गेले आहेत, अशी उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळतात. या साचेबध्द उत्तरामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. प्रभागातील अधिकाऱ्यांना बैठकीला किती वेळा बोलवावे याचेही नियोजन पालिका मुख्यालयातील वरिष्ठांनी करण्याची नागरिकांची मागणी आहे.