आयुक्त ई. रवींद्रन यांच्या पुढाकारामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. मात्र आयुक्तांचे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे फेरीवाले डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत. आयुक्त रवींद्रन यांनी एक दिवस कोणालाही न सांगता कल्याण येथून लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकात यावे आणि पूर्व भागात बसणारे फेरीवाले स्वत:च्या नजरेने पाहावे. म्हणजे महापालिकेचे कर्मचारी किती ‘प्रामाणिकपणे’ डोंबिवलीत काम करतात याचा प्रत्यय आयुक्तांना येईल, अशी चर्चा डोंबिवलीकरांमध्ये सुरू झाली आहे.

रेल्वे पादचारी पुलाच्या हद्दीत बसणारे फेरीवाले रेल्वे पोलिसांनी कायमचे हटविले आहेत. मात्र महापालिकेच्या हद्दीत स्कायवॉकवर, पुलाखाली, पदपथ,  रॉथ, पाटकर रस्त्यावरील फेरीवाले हटण्यास तयार नाहीत.

Story img Loader