रोझेस समुद्रातील हे असून एक फुलपाखरू आपण मागच्या लेखामध्ये ‘क्रिमसन रोझ’ हे फुलपाखरू पाहिले होते.
‘कॉमन रोझ’ हे नावाप्रमाणे खरोखरच कॉमन फुलपाखरू आहे. संपूर्ण आशिया खंडात याचा वावर आढळतो. त्यातही प्रामुख्याने अफगणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, फिलीपाइन्स आणि त्यातही पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यानंतर ही फुलपाखरे सापडतात.
या फुलपाखरांचे पंख हे क्रिमसन रोझ प्रमाणेच वेलवेटी काळ्या रंगाचे असतात, पण क्रिमसन रोझच्या पुढील पंखांवर मध्यभागी आणि कडेला उभे पांढरे पट्टे असतात. त्याऐवजी कॉमन रोझच्या पंखांच्या मध्यभागातून पांढऱ्या समांतर रेषा पंखांच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या असतात.
कॉमन रोझच्या मागील पंखावर, पंखांच्या कडेला लाल भरीव ठिपके असतात, तर मध्यभागी पांढऱ्या ठिपक्यांनी बनलेला एक आडवा पट्टा असतो. मागील पंखाच्या खालच्या बाजूस बाजूला स्व्ॉलो म्हणजे पाकोवीला असते. तशी एक शेपटी असते. (स्व्ॉलोटेला समुद्रातील बऱ्याचशा फुलपाखरांना अशी शेपटी असते). कॉमन रोझला या शेपटीचा उपयोग भक्ष्यकांना चकवण्यासाठी होत असतो. खरं म्हणजे फुलपाखरांच्या अळ्या विषारी वनस्पतींच्या पानावर वाढतात, त्यातली अलकलाइड्स त्यांच्या पोटात गेल्यामुळे हे फुलपाखरंसुद्धा विषारी बनतात. त्यामुळे त्यांच्या वाटेस सहसा भक्ष्यक जात नाहीत, परंतु काही वेळा शेपटी तुटलेली रोझेस फुलपाखरं आढळली आहेत.
कॉमन रोझ सुरवंट जरी विषारी असल्या तरी ‘ब्राको नीड’ प्रकारची गांधील माशी या अळ्यांच्या अंगावर अंडी घालते आणि या गांधील माशीच्या अळ्या कॉमन रोझ फुलपाखराच्या सुरवंटाच्या मांसावर जगतात. अशा वेळी या गांधील माशीच्या अळीवर या सुरवंटातील विषारी द्रव्याचा काहीच विपरीत परिणाम होत नाही हे विशेष.
या शेपटीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग या फुलपाखरांना होतो तो उडताना दिशा बदलण्यासाठी सुकाणू सारखा. हे फुलपाखरू हवेमधून अलगद फुलावर उतरते. ते अगदी बघण्यासारखे असते. अशा वेळी ते आपले फक्त पुढचे पंख हलवत राहतात आणि मागचे पंख आणि शेपटीसारखे टोक ठेवत फुलाकडे झेपावतात. या फुलपाखरांचीच एक व्हरायटी अंदमान बेटांवरती पहायला मिळते. या अंदमानी कॉमन रोझच्या मागील पंखावर असणारे पांढरे ठिपके हे आकाराने लहान असतात आणि त्यांची संख्याही कमी असते.
कॉमन रोझ फुलपाखरू अगदी पहाटेपासून उडायला सुरुवात करतात. संध्याकाळी गर्द झाडोरा असणारे ठिकाण निवडून झाडाच्या फांदीचा आसरा घेऊन इतर फुलपाखरांबरोबर हे विसावतात. या फुलपाखरांचे नर मोठय़ा संख्येने एकत्र येऊन चिखलातील खनिज द्रव्ये शोषताना (मड पेडलिंग) नेहमी आढळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

– उदय कोतवाल

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common rose