कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लाॅक किंवा काँक्रीटने सपाट न करता खोदलेल्या स्थितीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज खड्ड्यांचा त्रास होत आहे.

लांबलचक आकाराच्या या खोदलेल्या चऱ्या, खड्डे प्रेम ऑटो चौक येथे स्मशानभूमी समोर, बिर्ला महाविद्यालय रस्त्यावर आहेत. कल्याण रेल्वे स्थानकाकडून शहाडमार्गे मुरबाडकडे जाणारी आणि येणारी वाहने प्रेम ऑटो चौकातून बिर्ला महाविद्यालयमार्गे ठाणे, मुंबईकडे जातात, काही कल्याण रेल्वे स्थानकाकडे, शहरात येतात. सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणून प्रेम ऑटो चौक ओळखला जातो.

Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Pune Municipal Corporation Mission 15
Pune Mission 15 : ‘मिशन १५’ च्या रस्त्यांवर खोदाईला बंदी, काय आहे कारण ?
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Gajanan Vidyalaya located in busy Nabi Subhedar Layout Chowk poses accident risk to students
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, उपराजधानीतील गजानन विद्यालयाजवळील चौकात…
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
Mumbai Ahmedabad national highway potholes
वसई : महामार्गावर काँक्रिटीकरणानंतरही खड्डे, दुरुस्तीसाठी एजन्सीची नियुक्ती

हेही वाचा >>>डोंबिवलीत औषध विक्रेत्याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक

गेल्या दहा दिवसांपासून या चौकात लांबलचक आकाराच्या चऱ्या खोदण्यात आल्या आहेत. तेथे काही कामे करण्यात आली. या कामानंतर खोदलेल्या चऱ्या आहे त्या स्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून वाहन नेताना चालकाला कसरत करावी लागते. वेगात वाहन असेल तर ते या खड्ड्यात आपटून पुढे जाते. त्याचा वाहनातील प्रवाशांना त्रास होतो. एसटी बसमधील प्रवासी या खड्ड्यांमुळे बसमध्ये हेलपाटले जातात. रुग्णवाहिका चालकाला या भागातून रुग्ण नेताना काळजी घ्यावी लागते. या खड्ड्यांच्या समोर पालिकेची वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. विविध भागातून नागरिक पार्थिव घेऊन येथे येतात. त्यांनाही या खड्ड्यांचा त्रास होतो. बिर्ला महाविद्यालय, योगीधाम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी वाहू बस याच चौकातून येजा करतात. त्यामुळे विद्यार्थीही या खड्ड्यांनी त्रस्त आहेत.

हेही वाचा >>>अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या रस्त्याचा एक भाग सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. दोन्ही काँक्रीट रस्त्यांमधील भागात भूमिगत सेवा वाहिन्यांचा विचार करून पेव्हर ब्लाॅक बसविण्यात आले आहेत. वेगात असलेला वाहन चालक या पेव्हर ब्लाॅकजवळील खड्ड्याजवळ अडखळतो. रात्रीच्या वेळेत हे खड्डे निदर्शनास न आल्याने अनेक दुचाकीस्वार येथे पडतात, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्रेम ऑटो भागात एका एजन्सीने भूमिगत केबल वाहिन्या टाकण्याची कामे केली आहेत. ही कामे आता पूर्ण झाली आहेत. या ठिकाणच्या चऱ्या बुजविण्याची कामे तातडीने हाती घेण्यात येत आहेत.-जगदीश कोरे,कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.

मागील दहा दिवसांपासून प्रेम ऑटो भागातील चऱ्या, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण आहेत. अनेक दुचाकी स्वार येथे पडत आहेत. पालिका येथे मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का. हे काम न करणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने दहा लाखाचा दंड ठोठवावा.-ॲड. ज्ञानेश्वर देशमुख,रहिवासी. शहाड.

Story img Loader