कंपनीच्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होण्याची भीती; ‘रेलनीर’ला पाणी पुरवणाऱ्या काकोळे तलावाचे अस्तित्वही धोक्यात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ताहुली डोंगरातून वाहत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली अशी मजलदरमजल करीत येणारी वालधुनी नदी ही नदी आहे, असे म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. एके काळी परिसरातील मोठा जलस्रोत असलेली ही नदी तिच्या आसपासच्या शहरांतून वाहत येणाऱ्या औद्योगिक, रासायनिक, घरगुती सांडपाण्यामुळे पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. या शहरांतील भूमाफियांनी नदीकिनारी आणि काही ठिकाणी नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र रोडावत चालले आहे. त्यामुळे या नदीचा आता नाला बनला आहे. वालधुनीच्या शेवटच्या भागाकडे अशी परिस्थिती असताना आता या नदीच्या उगमाजवळ असलेल्या शुद्ध प्रवाहालाही धोका निर्माण झाला आहे. या नदीच्या सुरुवातीच्या भागालाही उद्योगांची मगरमिठी पडली आहे. त्यामुळे रेल्वेच्या ताब्यात असलेल्या काकोळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे चार दशलक्ष लिटर्स प्रतिदिन बारमाही पाणीपुरवठा करण्याची क्षमता असणाऱ्या या तलावावर दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने बाटलीबंद पाण्याचा रेलनीर प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
शहरी भागापुढील वाढते जलसंकट लक्षात घेता प्रति दिन चार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या या धरणावरपाणी सोडणे परवडणारे नाही. संबंधित विभागांनी याची नोंद घेऊन नदी पात्रातील अतिक्रमण रोखावे.
– सुधाकर झोरे, पर्यावरणप्रेमी
वालधुनी नदीच्या पात्रातील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्यानंतर गेल्या आठवडय़ात वालधुनी परिसरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. जुने नकाशे आणि दस्तऐवज तपासून यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– प्रशांत जोशी, तहसीलदार, अंबरनाथ
महामंडळाने नदीचे पात्र सुरक्षित राखण्याच्या बोलीवरच कंपनीला जागा दिली आहे. कंपनीनेही नदीच्या प्रवाहाची जागा सोडूनच कुंपण घातले आहे. त्यामुळे नदीपात्राला कोणताही धोका संभवणार नाही.
– हरिश्चंद्र पतंगे, उपअभियंता, एमआयडीसी, अंबरनाथ विभाग.
औद्योगिक विभागाने विस्तारीकरणाच्या नादात वालधुनीच्या पात्रात अतिक्रमण केल्याचे सकृद्दर्शनी स्पट दिसते. असे बांधकाम करण्यापूर्वी खरे तर केंद्रीय महसूल विभागाची परवानगी लागते.
– रा.वि. भुस्कुटे,निवृत्त तहसीलदार