लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिल्यानंतर पालिका, पोलीस, वाहतूक सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. परंतु, डोंबिवली एमआयडीसी परिक्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत. धुळीमुळे सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Mumbais air quality is in bad state due to year of inaction High Court critics on air pollution
वर्षभर काहीच प्रयत्न न केल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत
Mumbais air quality is currently in poor to very poor category
मुंबईची हवा खालावलेलीच, गारठा व प्रदूषकांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले

एमआयडीसी भागात काँक्रीटचे रस्ते झाले असले तरी या रस्त्यांवर कामे सुरू असताना पूर्ण क्षमतेने पाणी फवारले जात नाही. हि कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पाण्याने धुऊन काढणे आवश्यक होते. ही कामे रस्ते ठेकेदाराने केली नाहीत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत हवा कुंद झाली की या भागात धुळीचे धुरके तयार होतात. रस्त्यांच्या भागातील सोसायट्या, बंगल्यांमध्ये धुलीकण उडत असल्याने घरात धुळीचे थर तयार होतात. दिवसातून दोन वेळा लादी, भांडी धुवावी लागतात, असे रहिवाशांनी सांगितले.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

डोंबिवली एमआयडीसीतील रिजन्सी अनंतम समोरील सेवा रस्ता ते मानपाडा रस्त्यापर्यंतच्या सेवा रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरून सायंकाळच्या वेळेत दुचाकी, चारचाकी बरोबर आता केडीएमटी, नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसही धावत आहेत. त्यामुळे सेवा रस्ता भागात राहणारे रहिवासी धुळीने हैराण झाले आहेत. सेवा रस्त्यांची डागडुजी करणे हे एमआयडीसीचे काम आहे. तेही या धुळीने भरलेल्या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत.

डोंबिवली जीमखाना रस्ता, एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, एमआयडीसी ते मानपाडा पोहच रस्ता भागात सततच्या वाहन वर्दळींमुळे धूळ उडत आहे. धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एमआयडीसीकडून रस्त्यांवर पाणी, फवारे किंवा प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. याप्रकरणाची एमआयडीसीच्या वरिष्ठांनी दखल घेऊन एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाला आदेशित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-बंगल्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू, घोडबंदरमधील घटना; सर्वत्र होतेय हळहळ व्यक्त

पालिकेकडे तक्रारी

डोंबिवली एमआयडीसीत धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत. या भागातील नागरिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी करून धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील सर्व शासकीय यंत्रणांना धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक, आरटीओ अधिकारी यासाठी पुढाकार घेत आहेत. डोंबिवली एमआयडीसीत अशी कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी पालिकेत येत असल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या आदेशावरून एमआयडीसीला धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

“ धूळ नियंत्रणासाठी आम्ही एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांवर पाणी फवारणे आणि आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.” -शंकर आव्हाड,कार्यकारी अभियंता, एमायडीसी, डोंबिवली.

“ पालिका हद्दीतील सर्व शासकीय यंत्रणांनी धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे एमआयडीसी कार्यालयालाही त्यांच्या अखत्यारितील धुळीचे रस्ते, निर्माणाधीन रस्त्यांवरील धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले जाणार आहे.” -रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभाग,कडोंमपा.

“ एमआयडीसीत रस्ते काँक्रीटचे झाले तरी रस्ते पाण्याने साफ न केल्याने, सेवा रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्याने धुळीचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. शाळकरी मुले, वृध्द धुळीने सर्वाधिक त्रस्त आहेत.” -रेश्मा जोशी, रहिवासी.

“ धूळ नियंत्रणासाठी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मग, डोंबिवली एमआयडीसीतील अधिकारी सुस्त का आहेत. त्यांना न्यायालयाचा आदेश लागू नाही का.” -रेवती अमृतकर, रहिवासी.

Story img Loader