लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमधून या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या उपक्रमात झोपडपट्टी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. आता प्रत्येक शनिवारी शहरातील विविध भागात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय
Kalyan Dombivli Municipality on complaint of non collection of garbage
कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
pcmc health department to take punitive action if found garbage thrown in openly
कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी पुढाकार; आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांवर लक्ष

महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती. तेव्हापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ठराविक दिवशी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर, सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आला आहे. या मोहिमेत दैंनदिन साफसफाईबरोबरच मोठे आणि अंतर्गत रस्ते यांची सर्वंकष सफाई, पदपथ, रस्ते दुभाजक यांची सफाई करण्यावर भर देण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा, झाडाच्या फांद्या, कचरा उचलण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे.

आणखी वाचा-Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक

आयुक्त राव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, या उपक्रमात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय या भागातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. अशा ठिकाणे नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरूवात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेश्वर तलाव भागातील वस्तीमधून शनिवारी झाली. याठिकाणी शनिवारी सकाळी चार तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिका घनकचरा विभागासह इतर विभागाचे कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते. या उपक्रमात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई करण्यात आली. त्याचबरोबर येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. आता प्रत्येक शनिवारी शहरातील विविध भागात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

आणखी वाचा-Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी

शहरातील मुख्य रस्त्यांपाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात झोपडपट्टी भागातील अंतर्गत रस्ते, गल्ल्या, अडगळीचे परिसर, गटार सफाई आणि शौचालय यांची साफसफाई केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छत्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातून या उपक्रमाला सुरूवात झाली असून प्रत्येक शनिवारी शहरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. -मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader