ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाचशे खाटांची क्षमता वाढविण्याबरोबरच तिथे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यावर प्रशासनाने भर देण्यास सुरूवात केली आहे. याचा एक भाग म्हणून खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर कळवा रुग्णालयात आता उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आजारांच्या माहितीची संगणकात नोंद करून रुग्णांना नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकाच्या आधारे डॉक्टरांना एका क्लिकवर संबंधित रुग्णांची माहिती मिळवून त्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कल्याणमधील कोळसेवाडीतील प्रसूतीगृहात रात्री मद्याच्या मेजवान्या; प्रसूतीगृहाचा प्रस्ताव वर्षभरापासून लालफितीत

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय आहे. याठिकाणी दररोज दोन हजारहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश असतो. या रुग्णालयात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेविषयी गेल्या काही वर्षांपासून पालिकेकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. रुग्ण संख्येच्या तुलनेत हे रुग्णालय अपुरे पडत असल्याची ओरड होत आहे. काही महिन्यांपुर्वी रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. यानंतर रुग्णालयाच्या कारभारावर टिका झाली होती. यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयात पाचशे खाटांची क्षमता वाढविण्याबरोबरच तिथे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यावर भर देण्यास सुरूवात केली आहे. याठिकाणी केसपेपर आणि औषध खिडक्यांची संख्या वाढविल्याने रांगा कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर कळवा रुग्णालयात आमुलाग्र बदल करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात आढळला करोना रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना केसपेपर काढावा लागतो. त्यानंतर तो सात ते आठ खिडक्यांवर घेऊन फिरावा लागतो. हाच रुग्ण काही महिन्यानंतर पुन्हा उपचारासाठी आला तर त्याला नव्याने केसपेपर काढावा लागतो आणि डॉक्टरांना पुन्हा आरोग्यविषयक पुर्व इतिहास सांगावा लागतो. रुग्णाला नेमका काय आजार होता आणि त्यावर कोणती शस्त्रक्रिया झाली, अशी सर्व माहिती डाॅक्टरांनी पुन्हा घ्यावी लागते. त्यात यात रुग्ण आणि डाॅक्टरांचाही बराच वेळ खर्ची पडतो. हे पद्धत बाद करून खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर कळवा रुग्णालयात आता उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आजारांच्या माहितीची संगणकात नोंद करून रुग्णांना नोंदणी क्रमांक देण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या क्रमांकाच्या आधारे डॉक्टरांना एका क्लिकवर संबंधित रुग्णांची माहिती मिळवून त्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे. नव्या वर्षात हा प्रकल्प सुरु करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

काय आहे योजना

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यविषयक माहिती घेऊन त्याची संगणकात नोंद केली जाणार आहे आणि त्याआधारे रुग्णाला नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. संबंधित रुग्ण केव्हाही रुग्णालयात उपचारासाठी आला तर, त्याला डाॅक्टरांना आरोग्य पुर्व इतिहास सांगावा लागणार नाही. केवळ नोंदणी क्रमांक सांगावा लागणार आहे. त्याद्वारे डाॅक्टर रुग्णाचा पुर्व इतिहास पाहून त्यावर पुढील उपचार करणार आहेत.