डोंबिवली – येथील डाव्या चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी काॅम्रेड विजयानंद हडकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

हेही वाचा – शिवसेनेच्या कंटेनर शाखांवर अदानी समूहाची दुसऱ्यांदा कारवाई

हेही वाचा – ठाणे : वागळे इस्टेट परिसराची जलचिंता मिटणार, एमआयडीसीच्या जागेत दोन जलकुंभाची उभारणी

१९६१ मध्ये गोवा मुक्ती आंदोलनात ते विद्यार्थी दशेत सहभागी झाले होेते. भारतीय कम्युनिस्ट पक्षात ते सक्रिय होते. कम्युनिस्ट पक्षाच्या प्रकाशन विभागात, सोविएत मासिकात ते अनेक वर्षे काम करत होते. मुद्रित शोधक म्हणून त्यांची ओळख होती. रिक्षा चालक म्हणून त्यांनी डोंबिवलीत काम केले. लाल बावटा रिक्षा संघटनेची त्यांनी स्थापना केली. जनजागृतीच्या अनेक संघटनांमध्ये ते सहभागी होते. ठाणे जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील ते एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते.

Story img Loader