लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत महिलांना तिकीटामध्ये ५० टक्के सवलत तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा निर्णय ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हणजेच, ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरातील नागरिकांना लागू असणार आहे. प्रवाशांना सवलत मिळविण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. त्यामुळे ठाण्याबाहेरून शहरात नोकरी किंवा कामानिमित्त येणाऱ्या महिला प्रवासी, जेष्ठ नागरिकांना सवलत किंवा मोफत प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Mumbai, Metro 3, Passenger
भुयारी मेट्रोला प्रवाशांची प्रतीक्षाच, महिनाभरात केवळ सहा लाख १२ हजार ९१३ जणांचा प्रवास

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्याकाही वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्या कंपन्या, लघु उद्योगांची कार्यालये आहेत. येथील हजारो महिला आणि पुरूष कामगार प्रवासासाठी टीएमटी बसगाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच ठाणे शहरातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने अनेक महिला प्रवासी टीएमटी बसगाड्यांतून प्रवास करतात. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत.

आणखी वाचा-ठाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी भाजपचे प्रशस्त कार्यालय

ठाणे शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांपासून वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या २० ते २५ लाखांच्या घरात गेली आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये ४२७ कोटी १८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु महापालिका प्रशासनाने केवळ दोनशे कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना मोफत तर, महिला प्रवाशांना तिकीटामध्ये ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर करत महिलांसाठी बसगाड्यांमधील डाव्या बाजूकडील आसने आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. या योजनेचा सुभारंभ करण्यात आला आहे. गुरुवारपासून या सवलती प्रवाशांना लागू होणार आहेत. असे असले तरी हा निर्णय ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या प्रवाशांनाच लागू असणार आहे.

प्रवाशांचे महापालिका क्षेत्रातील म्हणजेच, ठाणे ते दिवा शहरातील वास्तव्याचे ओळखपत्र वाहक तपासणार आहेत. त्यानंतर महिलांच्या तिकीटामध्ये सवलत दिली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांनाही हाच नियम लागू असणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रा व्यतिरिक्त इतर भागातून येणाऱ्या महिला आणि जेष्ठ नागरिकांना तिकीटाच्या दरात सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.