समोर येणारी प्रत्येक गोष्ट तपासून पहायची. योग्य असेल तर त्याचा स्वीकार आणि अयोग्य असेल तर ते त्यागण्याची विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांनी बाळगला पाहिजे. तसेच एखादी वैज्ञानिक गोष्ट किंवा इतर कोणती गोष्ट उमगली म्हणजे आपल्याला सर्व आले असे होत नाही. जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा माणूस अहंकाराकडे आणि पर्यायाने अधोगतीकडे जातो. असे प्रतिपादन ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संस्कार विज्ञान सोहळ्याची सांगता समारंभ सोमवारी ठाण्यातील सीकेपी सभागृह येथे पार पडला. या सोहळ्याला डॉ. अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकार बोलत नाही”; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांचा आरोप

मनशक्ती प्रयोगकेंद्र तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय संस्कार विज्ञान सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसांच्या कालावधीत शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. या सोहळ्याचा सोमवारी सांगता समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला डॉ. अनिल काकोडकर विशेष अतिथी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व उद्योजक दीपक घैसास हे प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी काकोकडकर यांनी विज्ञान आणि अंधश्रध्दा यावर भाष्य केले. तर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी मनशक्तीच्या कार्यामागची संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांची भूमिका, त्यांनी केलेले संशोधन उपस्थितांना सविस्तर समजावून सांगितले. त्याला विज्ञानाचा आधार देत कृतीचा संस्कार त्यांनी घडवला असे कुवळेकर यांनी स्पष्ट केले. असंख्य सुदृढ मने घडतील तेव्हा समाज, राष्ट्र मोठे होईल. असेही ते म्हणाले. मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविकातून या संस्कार विज्ञान सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली तर मनशक्तीचे विश्वस्त आणि संशोधन संचालक गजानन केळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

हेही वाचा- ठाणे : पंजाबमधील सोनू खत्री टोळीचे गुन्हेगारांना आंबिवलीतून अटक

विज्ञान आणि संस्कार दुधारी शस्त्र

विज्ञान आणि संस्कार दोन्हीचा उद्देश माणसाचे आयुष्य सुखी करणे हाच असतो. मात्र हे दोन्ही दुधारी शस्त्र आहेत. मनावर वाईट संस्कार होऊ शकतात आणि विज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन काळानुसार योग्य ते संस्कार स्वतःवर आणि पुढच्या पिढीवर केले पाहिजेत, असे दीपक घैसास यांनी सांगितले. तर आजच्या काळात समाज माध्यमांवर वावर कसा असला पाहिजे, हाही संस्कार महत्वाचा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conclusion of sanskar vigyan ceremony organized on behalf of manashakti experiment center lonavla dpj