ठाणे येथील शिवाईनगर भागातील कॉन्कोर्ड डेव्हलपर्सचा आलिशान गृहप्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने या गृहसंकुलात घर घेणाऱ्या रहिवाशांनी गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे इमारतीसंबंधीची कागदपत्रे सादर केली. तसेच इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी)आणि पाणी सुविधा देण्याची मागणी केली. मात्र, येत्या २३ फेब्रुवारीला या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त जयस्वाल यांनी रहिवाशांना दिले. दरम्यान, या प्रकरणी इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र आणि पाणी सुविधा देण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिल्याची माहिती रहिवाशांकडून देण्यात आली.

Story img Loader