ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आला होता, तोच घोळ विधानसभा निवडणुकीत दिसून आला. ठाणे शहर मतदार संघातील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या मतदान केंद्रावर नावे आल्याचे दिसून आले. घोडबंदर भागात सोसायटीत केंद्र असतानाही त्यांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर आल्याने मतदारांमधून नाराजीचा सूर उमटत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला होता. अनेकांची नावे घराजवळील केंद्राऐवजी किंवा सोसायटीतल्या केंद्रा ऐवजी दूरवरच्या केंद्रावर होती. यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला होता यासंबंधीच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. निवडणूक विभागाच्या कारभारावर मतदारांनी टीकाही केली होती. या टिकेनंतर विधानसभा निवडणुकीत ही चूक सुधारली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>>ठाणे : मतदानाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्याच्या गृहजिल्ह्यात बैठका

 घोडबंदर भागातील गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. परंतु येथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. हिरानंदानी इस्टेटमध्येही असा प्रकार समोर आला, येथील काही मतदारांची नावे ढोकळी भागातील केंद्रावर होती. कोलशेत येथील काही संकुलात मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत, परंतु येथील रहिवाशांची नावे या केंद्राऐवजी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर होती.  गेल्यावेळी असाच घोळ होता, तो यंदाही कायम असल्याचे दिसून आले.  झोपडपट्टी भागातल्या मतदारांना सोसायटी मध्ये मतदानासाठी जावे लागत असल्याचे चित्र ठाणे विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी दिसून आले.