ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना संपविण्याची धमकी देणारे ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासाठी विविध प्रभाग समितीमधील लिपीक, शिपाई, काही खाजगी व्यक्ती पैसे गोळा करीत असून, त्यांनी घरकुल घोटाळे केले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. आहेर हे गुंडाच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि गुंड आहेर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पालिकेत हजेरी लावतात. त्यांची शैक्षणिक अर्हता खोटी आहेत. या सर्वांचे पुरावे पालिका आणि पोलीस आयुक्तांना देणार असून पोलिसांनी आहेर यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांसंदर्भात ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याशी संपर्क साधला असता, बाहेर असल्यामुळे आता काहीच प्रतिक्रीया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
महेश आहेर यांच्यासाठी काहीजण पैसे गोळा करत असल्याचा काँग्रेसचा आरोप; पोलिसांना दिला इशारा
काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ते काय म्हणाले? जाणून घ्या.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे
Updated: या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-02-2023 at 17:31 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress allegation that some people are collecting money for mahesh aher ssb