लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीच परवानगी दिली होती, असा दावा करत यासंबंधी फोनवरून झालेल्या संभाषणाचा पुरावा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी सर्वांसमोर उघड केला. तसेच निवडणुक लढण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचे पुरावे ४२ तासात जाहीर करा किंवा आरोप मागे घ्या, नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशाराही त्यांनी चव्हाण यांना दिला आहे. शिंदे यांच्या दाव्यामुळे ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ असल्याच्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

कोकण पट्टयात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाला फारशच्या जागा मिळल्या नाहीत. या कारणावरून नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरी केली असून त्यामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांचा समावेश आहे. बंडखोरी केल्यामुळे शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बंडखोरी करून निवडणुक लढण्यासाठी मनोज यांना दोन ते तीन कोटी रुपये मिळाले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला होता. दरम्यान, मनोज यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना उत्तरे देत शहराध्यक्ष चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

आणखी वाचा-कर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक

कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी शहराध्यक्ष चव्हाण यांना मी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी बिनधास्तपणे अर्ज दाखल करण्यास सांगितले होते, असा दावा करत मनोज यांनी त्याचे पुरावे म्हणून त्या संभाषणाची ध्वनीफित ऐकून दाखविली. दोन ते तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप करताना माझी किंमत तरी नीट करायला हवी होती. कारण, इतक्या किंमतीच्या माझ्याकडे गाड्याच आहेत. आम्ही आमच्या व्यवसायातून सर्वाधिक आयकर भरतो. त्यामुळे ५० किंवा १०० खोके घेतल्याचा तरी आरोप करायचा होता, असेही मनोज म्हणाले. रावणाला दहा तोंडे होते पण, आमच्या शहराध्यक्षला किती तोंड आहेत, हे माहिती नाही. तक्रारी करून ब्लॅकमेलिंक करणे, हे त्यांचे काम आहे. सुरज परमार केसबाबत सर्वांच माहित असल्याने त्याविषयी बोलणार नाही, असेही ते म्हणाले. लोकसभेच्या वेळेत पक्षाने विशाल पाटील यांनाही निलंबित केले होते. परंतु पुन्हा पक्षात घेतले. त्यामुळे मला निलंबित केले असले तरी आम्ही पक्षाकडे आमची बाजू मांडणार आहे. मी आजही काँग्रेसमध्ये असून पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझा प्रचार करित आहेत, असा दावाही त्यांनी केला.

आणखी वाचा-कल्याणमधील ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांचा राजीनामा

बालहट्टामुळे केदार यांना कोपरीतून लढावे लागले

केदार दिघे हे ठाणे शहरातून निवडणुक लढण्याची तयारी करत होते. परंतु बालहट्टामुळे त्यांना ठाणे ऐवजी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून निवडणुक लढवावी लागत आहे, हे त्यांनीच मला सांगितले होते. तसेच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात आम्ही गेले अनेक वर्षे काम करतोय. परंतु केदार यांचा काहीच संबंध नसताना त्यांना इथून उमेदवारी दिली आहे. आघाडीत आमच्यावर अन्याय झाल्यामुळे ही निवडणुक लढवित असल्याचा दावाही मनोज शिंदे यांनी केला.