कल्याण – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदरकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि रद्द केलेली खासदारकी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारने शुक्रवारी खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने संतप्त झालेल्या कल्याणमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग, युवा पदाधिकारी प्रणव केणे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे सहभागी झाले होते.

हेही वाचा – ठाणे : लाचेप्रकरणी जलसंधारण अधिकारी ताब्यात

काँग्रेसच्या अनेक नेत्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी अवमानकारक वक्तव्य केली होती. मग तो देशद्रोह नव्हता का. मग त्यावेळी त्यांचे पद का रद्द केले नाही. भाजपाच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह का, मोदी सरकार लोकशाहीची गळचेपी करत आहे. खा. राहुल गांधी यांची खासदारकी अशाच गळचेपीतून रद्द करण्यात आली आहे, असा आरोप जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला.

हेही वाचा – डोंबिवलीतील व्यावसायिकाला ठार मारण्याची शिर्डीतील दोन भावांची धमकी

तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून मोर्चेकरांनी रस्ता वाहतूक बंद केली. जोपर्यंत राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशार पोटे यांनी दिला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मोर्चेकरांना रस्त्यावरून उठवले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कायार्लयात जाऊन तहसीलदारांना एक निवेदन दिले. गांधी यांची रद्द केलील खासदारकी तात्काळ मागे घेण्यात आली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress march in kalyan in support of rahul gandhi ssb