ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विविध रस्त्यांवर लावण्यात आलेले अनावश्यक दुभाजक याविरोधात शहरात पडसाद उमटत असतानाच, सोमवारी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याचमुद्द्यावरून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. ठाण्यातील रस्ते कामात १६ टक्के दलाली घेतली जात असून यामुळे कामाचा दर्जा कसा मिळणार, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तसेच महापालिका प्रशासन म्हणते की सर्व चांगले आहे. पण, आयुक्तांनी माझ्याबरोबर फिरावे, मी त्यांना ठीकठीकाणी नेऊन परिस्थिती दाखवेल, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात अजित पवार गटाचे धरणे आंदोलन; संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने अनेक रस्त्यांचे नुतनीकरण केले. याशिवाय, शहरातून जाणारे महामार्गांची दुरुस्तीची कामे पावसाळ्यापुर्वी करण्यात आली. रस्ते नुतनीकरणामुळे शहरातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत असले तरी महामार्गांवर मात्र खड्डे पडले आहेत. पाऊस, खड्डे आणि त्यात रस्त्यावर साचणारे पाणी यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक अरुंद रस्त्यांवर दुभाजक बसविण्यात आले असून यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून शहरात पडसाद उमटत असतानाच, याच मुद्द्यावरून सोमवारी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करून संताप व्यक्त केला.

हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमध्ये खाद्य पदार्थांच्या हातगाड्या सुरू

पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत पाहणी दौरा झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करण्यात आले होते. जागोजागी खड्डेमुक्त ठाणे अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यांवरील खड्ड्याबाबत खरे चित्र समोर आले आहे.  ठाण्यातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत, जिथे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी तुंबत होते, तिथे आजही तिच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारच्या नियोजनाविनाच कामे करण्यात आल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती देण्यात येते. मुख्यमंत्र्यानी स्वतःच्या वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांची पाहणी केली तरी त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली. अनावश्यक ठिकाणी लावण्यात आलेल्या दुभाजकामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे, असा दावाही त्यांनी केला.