आरे जंगलात मेट्रो कारशेडला विरोध होत असताना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने आज ठाण्यात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले. सुरूवातीला हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर होणार होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तुघलकी निर्णय घेणाऱ्या ईडी सरकारविरोधात आंदोलन सुरुच राहिल, अशी आक्रमक प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचे थैमान, रस्त्यावर पाणीच पाणी; अनेक ठिकाणी भूस्खलन, मृतांचा आकडा २१ वर

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

“ईडी सरकारचा निषेध असो” अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून  देण्यात आल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आरे वाचवण्यासाठी आगामी काळात काँग्रेसकडून झाडांना मिठी मारून ‘चिपकू’ आंदोलन करण्यात येणार आहे. आरे कारशेड विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. आरे कारशेडला मोठा विरोध असतानाही राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आरेच्या जंगलातील कारशेडवर ठाम आहे. त्याचा विरोध करण्यासाठी पर्यावरण संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन केले जात आहे.

Gold-Silver Price on 21 August 2022: सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आजची किंमत

मुंबईची फुप्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच राहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द व्हावे, यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहेत. मुंबई शहराच्या मध्यभागी मुंबईकरांना प्राणवायूचा पुरवठा करणारे पर्यावरणाचे महत्त्व जपणारे, जैवविविधतेने नटलेले आरेचे जंगल आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली होती. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री होते.  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली.

Story img Loader