ठाणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले असून या विजयाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी जिल्हा  कार्यालय परिसरात ढोल-ताशे वाजवून फटाके फोडून जल्लोष केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले. या निकलानंतर काँग्रेस पक्षाचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा >>> वाढत्या तापमानासह दमटपणाने ठाणेकर घामाघूम; तापमान चाळीशीआत, पण दमटपणा चाळीशीपार

washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
complaint with allegations against Ranjit Kamble says he is sand mafia and gangster
‘रणजित कांबळे हे रेती माफिया, गुंडागर्दी करणारे’, आरोपासह तक्रार
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

अशाचप्रकारे ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी जिल्हा  कार्यालय परिसरात ढोल-ताशे वाजवून फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे, महिला अध्यक्षा वैशाली भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा आंनद व्यक्त केला. तसेच विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधून विजयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपा सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करून कर्नाटकातील काँग्रेस व विरोधी पक्षनेत्यांवर सुडबुद्दिने विविध कारवाई केली. त्यामुळेच कर्नाटक जनतेने त्यांना त्याची खरी जागा दाखवून दिली.

हेही वाचा >>> ठाणे कारागृह परिसरातील दहा बांधकाम प्रकल्पांना मान्यता; पाच वर्षानंतर झालेल्या स्थायी समितीची बैठकीत निर्णय

पंतप्रधान फक्त मन की बात करीत राहीले, जन की बात मात्र करीत नव्हते. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कायम जनतेमध्ये जाऊन जन की बात ऐकत होते, त्याचे प्रश्न समजावून घेत होते. भाजपा करित असलेले जातीयवादी विचार कर्नाटक जनतेने उधळून लावले आणि सर्व धर्म समभावचा नारा देणाऱ्या काँग्रेसला साथ दिली, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.