गेल्याकाही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसआणि ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांवरून जुंपली असताना बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक ध्वनीफित प्रसारित केली आहे. ही ध्वनीफित महेश आहेर यांची असून आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा कट आहेर यांनी रचल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याप्रकारानंतर आहेर यांनी ध्वनीफितीचे खंडन केले आहे. तर अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे माहित आहे, असे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले.

हेही वाचा >>>चिमुरड्यांच्या शिक्षणाच्या तळमळीला मुख्यमंत्र्यांची साद ! तराफ्याचा जीवघेणा प्रवास थांबवून केली बोटीची व्यवस्था…

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. मंगळवारी आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. त्यामध्ये त्यांनी आहेर हे एका व्यक्तिला फोन करून ते अंडरवर्ल्डच्या संपर्कात आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांना संपवणार असल्याचे म्हटले होते. या ट्विटनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. त्यातच बुधवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक ध्वनीफीत प्रसारित केली. महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या संभाषणात, ” माझे जेव्हा सुरक्षा काढली. तेव्हा रात्री पावणे बारा वाजता मुख्यमंत्ऱ्यांनी सह आयुक्तांना संपर्क केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असे मी करून ठेवले आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवो आहे . आव्हाड माझे केव्हाही काही करू शकतो…अस मी क्रीयेट करून ठेवलं आहे. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नताशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केला.

हेही वाचा >>>मोठी बातमी: जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

तर तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावल. त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार , म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असत? प्लानिंग केलं आहे. तो साप आहे सर्व प्लान केला आहे. त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला ! माझा माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रोपार्टी साठी काम करतो,” असे महेश आहेर याने या संभाषणात म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. दरम्यान, अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे आपणांस माहित आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Story img Loader