ठाणे : मैत्रिणीचे काही खासगी छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून ठाण्यातील स्वयंम परांजपे याची मयुरेश धुमाळ या तरूणाने कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयुरेश धुमाळ (२४) आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोपरी पोलीस ठाण्यात सुरू आहे. स्वयंम हा बांधकाम व्यवसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

स्वयंम परांजपे कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरातील एका गृहसंकुलात वास्तव्यास आहे. एप्रिल महिन्यात एका लग्नसमारंभामध्ये त्याची ओळख २० वर्षीय मुलीसोबत झाली होती. त्याने तरुणीला त्याच्या कारमधून फिरायला नेतो असे सांगून घरी नेले. तिथे तिला गुंगीचे पदार्थ पाण्यामध्ये दिले. त्यानंतर स्वयंम याने तिचे काही छायाचित्र काढले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी बोलावत असे. याबाबतची माहिती तिने मयुरेश याला दिली होती. शुक्रवारी सकाळी स्वयंम याला भेटण्यासाठी मयुरेश, संबंधित तरूणी गेले. त्यांनी स्वयंम याला छायाचित्र मोबाईलमधून डिलीट करण्याची विनंती केली. त्यावेळी मयुरेश आणि स्वयंम यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून मयुरेश याने स्वयंम याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मयुरेश आणि त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान “छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर मुंब्र्यात उभारुन दाखवा, आम्ही..”
Story img Loader