डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत नवापाड्यात सुभाष रस्त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या नवापाडा शाळेजवळ भूमाफियांनी सामासिक अंतर न सोडता आजुबाजूच्या चाळी, इमारतींना खेटून आठ माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीमुळे आमच्या घरात अंधार पडेल असे आजुबाजूच्या इमारती, चाळींमधील रहिवाशांनी भूमाफियांनी सांगितल्यावरही त्यांनी दादागिरीचा अवलंब करून रहिवाशांना गप्प राहण्याचा इशारा दिला आणि बेकायदा इमारत बांधून पूर्ण केली.

डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्त्यावर गणेश विद्यालयाजवळ नवापाडा पालिका शाळेलगत (साईबाबा मंदिर शेजारी) ही बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेला अंधारात ठेऊन, पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता या इमारतीची उभारणी भूमाफियांनी केली आहे. यासंदर्भात तक्रारदारांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल ह प्रभाग कार्यालय किंवा पालिका मुख्यालयात घेतली जात नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही वाचा – ठाण्यात थकबाकीदारांच्या ६११ नळजोडण्या खंडीत, ३० मोटर पंप जप्त

या इमारतीच्या बाजूने आठ फुटाचा पालिकेचा अरुंद रस्ता आहे. हा रस्ता या इमारतीसाठी पोहच रस्ता म्हणून उपलब्ध आहे. या बेकायदा इमारतीमधील सदनिका बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन भूमाफियांनी विकण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून सामान्य घर खरेदीदारांची या बेकायदा इमारतीत घरे घेऊन फसवणूक होणार आहे, असे तक्रारदारांनी सांगितले. या बेकायदा इमारतीमुळे या भागात चाळीस वर्षाहून अधिक काळ राहत असलेल्या रहिवाशांच्या घरात काळोख पडू लागल्याने रहिवासी त्रस्त आहेत. याविषयी उघड बोलले तर भूमाफिया दहशतीचा अवलंब करत असल्याने स्थानिक रहिवासी गुपचिळी धरून बसले आहेत.

आजुबाजूला चाळी, जुन्या इमारती त्यामध्ये सामासिक अंतर न ठेवता या बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीत काही दुर्घटना घडल्यास या इमारतीत अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका नेण्यासाठीही जागा नाही. या इमारतीमधील जल, मलनिस्सारणाच्या वाहिन्या टाकण्यासाठीही या भागात जागा नाही. त्यामुळे या बेकायदा इमारतीत रहिवास सुरू होण्यापूर्वी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पुढाकार घेऊन ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

ह प्रभागातील कारवाईच्या प्रतीक्षेतील बेकायदा बांधकामे

देवीचापाडा येथील गावदेवी मंदिराजवळील शशिकांत सुरेश म्हात्रे, योगेश हरिश्चंद्र भोईर यांची बेकायदा इमारत, प्रसाद सोसायटी दत्त मंदिराजवळील दुसऱ्या गल्लीतील बेकायदा बांधकाम, राहुलनगरमधील सुदामा रेसिडेन्सी, ठाकुरवाडीतील शिवलिला इमारत, कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचे बांधकाम. कुंंभारखामपाडा खंडोबा मंदिराजवळील बेकायदा बांधकाम.

हेही वाचा – कल्याणमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणाचा खून

नवापाड्यात बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आली असेल तर त्या इमारतीची पाहणी करून संबंधितांना कारवाईच्या नोटिसा दिल्या जातील. विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाईल. इतर इमारतींवरही कारवाई केली जाणार आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

Story img Loader