कल्याण : मध्य रेल्वेच्या दिवा-वसई रेल्वे मार्गावरील भिवंडी जवळील खारबाव-कामण रेल्वे मार्गावरील एक रेल्वे फाटक बंद करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यासाठी रेल्वे मार्गावर एक उड्डाण पूल बांधला जात आहे. या कामासाठी २५ कोटीची तरतूद प्रशासनाने केली आहे. भिवंडी जवळील खारबाव, कामण परिसरात नव्याने औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. व्यापारी दळणवळणाचे एक मोठे केंद्र या भागात विकसित होत आहे. त्यामुळे या भागात वाहनांची वर्दळ वाढली आहे.

कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, बदलापूर भागातील बहुतांशी नोकरदार अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून, काही बसने कल्याण बस आगारातून खारबाव, कामण भागात जात आहेत. खारबाव, कामण भागात रस्ते मार्गाने जाताना खारबाव-कामण रेल्वे मार्गातील एका रेल्वे फाटकाजवळ शटल, एक्स्प्रेस किंवा मालगाडी जात नाही, तोपर्यंत थांबावे लागत होते. अनेक मालवाहू वाहने, रुग्णवाहिका या रेल्वे फाटकात अडकून पडत होत्या. मध्य रेल्वेने ७२ रेल्वे फाटके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये खारबाव फाटकाचा समावेश आहे.

Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

हेही वाचा >>> डोंबिवलीत देवीचापाडा येथे बेकायदा इमारतीचे काम पुन्हा सुरू

या पुलाच्या कामासाठी राज्य सरकारने १२ कोटी ५० लाख, नवी दिल्ली-जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मार्ग प्रशासनाने ६ कोटी २५ लाख, मध्य रेल्वेने सहा कोटी २५ लाख रूपये भागीदारी पध्दतीने या पुलाच्या कामासाठी निधीची तरतूद केली आहे. रेल्वे मार्गावरील पुलावर तुळया टाकण्याचे पूर्ण करण्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यांची कामे ७० टक्के पूर्ण झाली आहेत. ती लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पूर्व बाजुच्या पोहच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बाजुच्या पोहच रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. पोहच रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.