डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर समोरील आनंद नगर मैदानाला खेटून एका भूमाफियाने बेकायदा इमारतीचे बेकायदा बांधकाम जोमाने सुरू केले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने या कामाकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष जाणार नाही, अशा पद्धतीने घाईघाईने स्लॅब टाकून हे काम पूर्ण करण्याच्या हालचाली भूमाफियांनी सुरू केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजुबाजूच्या इमारती, मैदानाजवळ तीन ते सहा मीटर सामासिक अंतर न ठेवता भूमाफियांनी या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यापूर्वी हे बांधकाम पूर्ण व्हावे म्हणून चार ते पाच दिवसांच्या अंतराने घाईघाईने स्लॅब टाकण्याची कामे पूर्ण केली जात आहेत.

हेही वाचा – राज्य ‘सेट’चा निकाल केवळ साडेसहा टक्के, मुलांनी टाकले मुलींना मागे

आनंद नगर मैदानात सकाळ, संध्याकाळ परिसरातील तरुण मुले, मुली क्रिकेट, लहान मुले मनोरंजनासाठी, फूटबाॅल खेळण्यासाठी येतात. मैदानाच्या चारही बाजूने मोकळी जागा असल्याने खेळाडू समाधानी होते. आता मैदानाला लागून बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने खेळाडूंमध्ये अस्वस्थता आहे. या बांधकामांमुळे या मैदानात क्रिकेट खेळणे मुश्किल होईल. चेंडूचा प्रत्येक फटका मैदानाजवळील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांच्या घरात गेला तर रहिवासी आणि खेळाडू यांच्यात दररोज वाद होतील. यापूर्वी या मैदानाच्या चारही बाजूने मोकळी जागा असल्याने खेळाडू मोकळेपणाने मैदानात खेळत होते. या मैदानात काही खेळाडू टेनिस चेंडूवर सराव करतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र खेळपट्टी या मैदानात आहे. डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर, उमेशनगर भागातील हे एकमेव मैदान आहे. आता त्या मैदानाच्या कोपऱ्या भूमाफियांनी बेकायदा इमारत बांधण्यास सुरुवात केल्याने खेळाडूंमध्ये अस्वस्थता आहे. या इमारतीच्या चारही बाजूने अंतर नसल्याने या इमारतीत रहिवास सुरू झाल्यावर या इमारतीमधील सांडपाणी, मलपाणी मैदानात येऊन दुर्गंधी पसरण्याची भीती खेळाडूंनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – एमपीएससीचा निम्न श्रेणी लघुलेखक पदाचा निकाल जाहीर, येथे पहा निकाल

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी खेळाडू, या भागात नियमित येणारी लहान मुले, ज्येष्ठांचा विचार करुन मैदानाशेजारी सुरू असलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राहुलनगर परिसरातील रहिवासी, खेळाडूंकडून करण्यात येत आहे. मुंब्रा येथील एक भूमाफिया स्थानिकांना हाताशी धरुन हे बांधकाम करत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या बांधकामाच्या ठिकाणी माफिया, त्यांचे पंटर बसले असल्याने त्यांच्या दहशतीमुळे कोणीही या बांधकामाविरुद्ध बोलण्यास तयार नाही. पालिकेच्या नगररचना अधिकाऱ्याने राहुलनगर समोरील मैदानाजवळ कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी दिलेली नाही, असे सांगितले.