डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कोपर गावमध्ये सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कोपरमधील ९० फुटी रस्त्यावरील शिवसेना शाखेजवळ साई आर्केड इमारतीच्या बाजुला कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता स्थानिकांनी बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील महिन्यांपासून या भागातील स्थानिक नागरिक, काही जागले या बेकायदा बांधकामाविषयी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडे तक्रारी करत आहेत, त्याची दखल घेतली जात नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. पालिकेकडून या बेकायदा बांधकामाची दखल घेतली जात नसल्याने एका तक्रारदाराने या प्रकरणी मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा – मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी

कोपरमध्ये ९० फुटी रस्त्यावर शिवसेना शाखेजवळ बांधकाम सुरू असताना ह प्रभागातील बीट मुकादम, नियंत्रक कनिष्ठ अभियंता यांना हे बेकायदा बांधकाम दिसत नाही का, असे प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत. पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही असे हमीपत्र दिले आहे. तरीही पालिका हद्दीत नव्याने बेकायदा बांधकामे सुरू असल्याने डोंबिवलीतील एक जागरूक नागरिक किशोर सोहोनी यांनी आयुक्तांच्या उच्च न्यायालयातील बेकायदा बांधकामाविषयी दिलेल्या हमीपत्राला आव्हान देणारी एक याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. यामुळे आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यापासून कोपरमध्ये ९० फुटी रस्त्यावर भूमाफिया दिवसाढवळ्या बेकायदा इमारत, व्यापारी गाळ्यांची उभारणी करत असताना आयुक्त, अतिक्रमण नियंत्रक उपायुक्त या तक्रारीची दखल घेत नसल्याने तक्रारदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बेकायदा इमारतीची उभारणी करतानाच त्यामध्ये रहिवाशांना निवास करता येईल अशा पद्धतीने बांधकाम पूर्ण केले जात आहे. चालू बांधकामात खिडक्या, गच्च्यांना दरवाजे, व्यापारी गाळ्यांना लोखंडी शटर लावून गाळे विक्रीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा – ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

कोपर भागात सखारामनगर काॅम्पलेक्स भागात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर दोन ते तीन बेकायदा इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. या इमारतींवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

कोपर भागात कारवाई करताना खूप राजकीय दबाव येत असल्याच्या प्रसंगी दमदाटीला सामोरे जावे लागत असल्याचे अधिकारी सांगतात.

नगररचना अधिकाऱ्यांनी पालिकेने कोपर भागात ९० फुटी रस्त्यावर एकही इमारतीला परवानगी दिलेली नाही, असे सांंगितले. तर ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी प्राप्त तक्रारीची माहिती घेऊन संबंधित बांधकामाची पाहणी करून ते बेकायदा असेल तर जमीनदोस्त केले जाईल, असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of illegal building near kopar shivsena branch in dombivli ssb
Show comments