डोंबिवली – बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण, डोंबिवलीत नागरिकांची घर खरेदीत सर्वाधिक फसवणूक होत आहे. बेकायदा बांधकामांमध्ये पालिकेच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून इमारती ठोकण्यात येत आहेत. हे सर्व प्रकार कायमचे रोखण्यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी यापुढे पालिका हद्दीतील इमारत बांधकाम परवानग्या या फक्त ऑनलाईन माध्यमातून स्वीकाराव्यात असे आदेश दिले आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांना घर खरेदी करताना ऑनलाईन माध्यमातून बांधकाम परवानगीचा क्युआर कोड स्कॅन करून महाराष्ट्राच्या विविध भागातून घर बसल्या कल्याण डोंबिवली पालिकेने दिलेली इमारत बांधकाम परवानगी, आपण घेत असलेले घर अधिकृत आहे ना हे बघता येणार आहे. कल्याण, डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीत अधिकप्रमाणात फसवणूक होऊ लागल्याने पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, साहाय्यक संचालक नगररचना सुरेंद्र टेंगळे यांनी इमारत बांधकाम परवानगी मंजुरीचे प्रस्ताव यापुढे ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हस्त पद्धतीने वास्तुविशारदांकडून नस्ती स्वीकारण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे, असे साहाय्यक संचालक टेंगळे यांनी सांगितले.

अडचणी दूर

नगररचना विभागात ऑनलाईन परवानगीचे प्रस्ताव स्वीकारणारी ‘इमारत आराखडा व्यवस्थापन पद्धत’ (बीपीएमएस) यापूर्वीपासून होती. शासनाच्या महाआयटीच्या नियंत्रणाखाली ही पद्धत कार्यान्वित होती. पालिकेत ही पद्धत प्रभावीपणे तांत्रिकअडचणींमुळे वापरणे शक्य होत नव्हती. वास्तुविशारद, नगररचना अधिकाऱ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. डोंबिवलीत बालभवन येथे महाआयटीचे प्रोग्राम अधिकारी, बीपीएमएसचे अधिकारी, एमसीएचआयचे सदस्य, वास्तुविशारद संघटनेचे सदस्य, नगररचना विभागाचे शशिम केदार, इतर अभियंते यांचे साहाय्यक संचालक सुरेंद्र टेंगळे यांच्या उपस्थितीत एक शिबीर घेण्यात आले. यावेळी सर्व तांत्रिक अडचणींची सोडवणूक करण्यात आली. टीडीआरही ऑनलाईन पद्धतीने दिला जाईल, असे टेंगळे यांनी सांगितले.

Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा…
Abhay yojana for property tax and water bill exemption in Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी सवलतीची अभय योजना
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
resident was brutally beaten up after being asked to remove firecracker stalls from the footpath Dombivli news
डोंबिवलीत पदपथावरील फटाके स्टाॅल काढण्यास सांगितल्याच्या रागातून रहिवाशाला बेदम मारहाण; डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील प्रकार
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई

महारेराला जोडणी

पालिकेची क्युआर कोड असलेली इमारत बांधकाम परवानगी पालिकेच्या संकेतस्थळासह महाआयटीच्या माध्यमातून महारेराच्या संकेतस्थळाला जोडण्यात आली आहे. महारेराकडे बांधकाम परवानगीचे कागदपत्र वास्तुविशारदांनी दाखल केले की महारेरा अधिकारी पालिकेचे संकेतस्थळ किंवा महारेराच्या संकेतस्थळावरून संबंधित कागदपत्रांची छाननी करून त्या इमारतीला महारेरा प्रमाणपत्र देतील. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, साहाय्यक संचालक टेंगळे यांनी काही वर्ष रेंगाळलेला हा महत्वाचा विषय मार्गी लावल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा – ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय

नागरिकांची घर खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकारामुळे हा महत्वाचा विषय मार्गी लागला आहे. नगररचना विभागात यापुढे ऑनलाईन माध्यमातून बांधकाम परवानगीचे प्रस्ताव स्वीकारले जातील. ऑनलाईन माध्यमातूनच परवानगी दिली जाणार आहे. नागरिकांना घरबसल्या घर घेत असलेल्या इमारतीची माहिती क्युआर कोड स्कॅन करून पालिकेच्या संकेतस्थळावरून तपासून घेता येणार आहे. – सुरेंद्र टेंगळे, साहाय्यक संचालक.

Story img Loader