डोंबिवली – बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण, डोंबिवलीत नागरिकांची घर खरेदीत सर्वाधिक फसवणूक होत आहे. बेकायदा बांधकामांमध्ये पालिकेच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून इमारती ठोकण्यात येत आहेत. हे सर्व प्रकार कायमचे रोखण्यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी यापुढे पालिका हद्दीतील इमारत बांधकाम परवानग्या या फक्त ऑनलाईन माध्यमातून स्वीकाराव्यात असे आदेश दिले आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांना घर खरेदी करताना ऑनलाईन माध्यमातून बांधकाम परवानगीचा क्युआर कोड स्कॅन करून महाराष्ट्राच्या विविध भागातून घर बसल्या कल्याण डोंबिवली पालिकेने दिलेली इमारत बांधकाम परवानगी, आपण घेत असलेले घर अधिकृत आहे ना हे बघता येणार आहे. कल्याण, डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीत अधिकप्रमाणात फसवणूक होऊ लागल्याने पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, साहाय्यक संचालक नगररचना सुरेंद्र टेंगळे यांनी इमारत बांधकाम परवानगी मंजुरीचे प्रस्ताव यापुढे ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हस्त पद्धतीने वास्तुविशारदांकडून नस्ती स्वीकारण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे, असे साहाय्यक संचालक टेंगळे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा