कल्याण – दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणावर येथील खासगी रुग्णालय प्रशासनाने अतिशय निष्काळजीपणे उपचार केले. या रुग्णाच्या पायाच्या संवेदना गेल्यानंतर त्याला रुग्णालयात निरीक्षणाच्या नावाखाली सात तास उपचार न करता झोपून ठेवले. शेवटच्या क्षणी त्यांना मुंबईत केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. या सगळ्या प्रक्रियेत तरुण रुग्णाला आपला पाय कायमचा गमवावा लागला. या निष्काळजीपणाबद्दल रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले.

तक्रारीसाठी रुग्ण योगेश राजकुमार पाल यांना आलेल्या खर्चापोटी ३० हजार रुपये रुग्णाला देण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्या पूनम महर्षी यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात कल्याणमधील खासगी रुग्णालय, ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
National Health Policy What percentage of expenditure from the public health fund from the budget
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, आरोग्यावर फक्त ४.९१ टक्के खर्च ; ‘कॅग’चे आरोग्य यंत्रणेवर ताशेरे

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणारा चोरटा अटक

ऑक्टोबर २०१० मध्ये तक्रारदार योगेश पाल दुचाकीवरून चालले होते. त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला दुखापत असल्याने तेथे प्लास्टर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. दोन दिवसांनी योगेश यांना आपल्या दुखापत झालेल्या उजव्या पायाची हालचाल होत नसल्याचे, त्याला संवेदना नसल्याचे आढळले. कुटुंबीयांना योगेशला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पायाचे प्लास्टर अतिशय घट्ट केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आले. दुखापतीच्या ठिकाणी गुंतागुंत झाल्याचे उपचारी डाॅक्टरांना दिसले. कल्याणमधील रुग्णालयातील डाॅक्टरांनी योगशेला केईएम रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तेथील डाॅक्टरांनी अतिशय घट्ट पद्धतीने प्लास्टर केल्याने पायाची दुखापत अतिशय गंभीर झाल्याचे दिसले. पाय काढण्याचा निर्णय केईएम रुग्णालयात घेण्यात आला.

हेही वाचा – ठाणे-पालघर : विकासाचा वेग आणि ताण

कल्याणमधील खासगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने योगेशला पाय गमवावा लागला. त्याला बारावीची परीक्षा देता आली नाही. त्याला मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. कृत्रिम पायासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करून योगेशने आपला दिनक्रम सुरू ठेवला आहे. खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपणास पाय गमवावा लागला. संबंधित खासगी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध योगेशने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली. बारा वर्षे हा दावा मंचासमोर सुरू होता. खासगी रुग्णालयात सुसज्ज सुविधा असताना तेथील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष मंचाने काढला. रुग्णालय प्रशासनाला रुग्ण योगेशला भरपाई देण्याचे आदेश दिले.

Story img Loader