लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघातील कोपरी परिसराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी फुटली. दुरुस्तीचे काम पुर्ण करून पालिकेने बुधवार सकाळपासून परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे आधीच पाणी टंचाईचा सामना करावा लागलेले नागरिक दुरुस्ती कामानंतर होणाऱ्या दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोपरी परिसर येतो. येथील धोबीघाट परिसरातील जलकुंभावरून परिसरात पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलकुंभातून परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी फुटली. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पालिकेच्या पथकाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. या कामामुळे १२ तासाहून अधिक काळ कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. जलवाहिनी फुटलेल्या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर मंगळवार सायंकाळपासून प्रसारित होत होती आणि त्यासोबत कोपरीकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येते होते. एका बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे कोपरीकरांना पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे, असेही संदेशात म्हटले होते.
आणखी वाचा- ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने रहिवासी हैराण
जलकुंभाशेजारीच बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. जलकुंभ आणि बांधकाम प्रकल्पाची संरक्षक भिंत एकच आहे. या भिंतीखालूनच परिसराला पाणी पुरवठा करणारी ५०० मी मी व्यासाची जलवाहिनी जाते. दोन महिन्यांपुर्वी बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू असताना, जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली होती. त्यावेळेसही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. आताही बांधकाम प्रकल्पाच्या कामामुळेच मंगळवारी सायंकाळी पुन्हा जलवाहिनी फुटल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर, पालिकेकडून मात्र बांधकाम प्रकल्पाच्या कामामुळे जलवाहिनी फुटलेली नसल्याचा दावा केला जात आहे. संरक्षक भिंतजवळील कामामुळे जलवाहिनीवरील माती निघून गेली होती. या जलवाहिनीच्या सांध्याजवळ पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु पाणी पुरवठा सुरू होताच त्याच्या दाबामुळे जलवाहिनी सांध्यातून निखळली, असा दावा महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पालव यांनी केला.
दुषित पाण्याचा पुरवठा
जलवाहिनी फुटल्याने कोपरी परिसराचा पाणी पुरवठा १२ तासाहून अधिक काळ बंद होता. यामुळे कोपरीकरांचे पाण्याविना हाल झाले. जलवाहिनी दुरुस्ती करून पालिकेने कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केला. पण, परिसरातील काही भागात मात्र दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. घरातील नळांमध्ये येणारे पाणी गढूळ असून त्याला गटाराच्या पाण्यासारखी दुर्गंधी येत आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटल्यानंतर त्यात माती शिरल्यामुळे काही भागात दुषित पाण्याचा पुरवठा होत असावा, अशी शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.