लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : दररोज पाच लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. या स्वच्छतागृहात मुतारीसाठी कोणतेही शुल्क नसताना प्रत्येक प्रवाशाकडून मुतारीच्या वापरासाठी दोन रुपयांची वसूली कंत्राटदाराकडून सुरू आहे. याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यास तेथील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना दमदाटी केली जात असून या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Live: महाविकास आघाडीला १६०-१६५ जागा मिळणार, संजय राऊतांना विश्वास
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
The viral video has received more than 20 million views
मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral
Mumbai Exit polls
Mumbai Exit Polls Update : मुंबईत आवाज कुणाचा? महायुतीची गर्जना की मविआची डरकाळी? एक्झिट पोलचे अंदाज वाचा!
Devendra Fadnavis On Maharashtra Vidhan Sabha Exit Poll
Devendra Fadnavis : एग्झिट पोलच्या अंदाजांवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जेव्हा मतदान…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
son shouting at a mother in a railway Viral video on social media
मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करत असतात. मध्य रेल्वे स्थानकातील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक ठाणे रेल्वे स्थानक आहे. स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन येथे मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. या स्वच्छतागृहाचे कंत्राट दिले आहेत. मुतारी वगळता इतर वापरासाठी स्वच्छतागृहात दर आकारण्यास कंत्राटदाराला परवानगी आहे. असे असतानाही या स्वच्छतागृहांमध्ये प्रत्येक प्रवाशांकडून दोन रुपये आकारले जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. या बाबत एखाद्या प्रवाशाने जाब विचारल्यानंतर त्यांना स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केली जाते. या स्वच्छतागृहांचा वापर दिवसाला किमान तीनशे ते चारशे प्रवासी वापर करतात. त्यामुळे स्वच्छतागृहाच्या नावाने प्रवाशांची लुबाडणूक सुरू आहे.

आणखी वाचा-विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

तसेच बेकायदेशीररित्या पैसे घेऊन देखील या स्वच्छतागृहाची अवस्था अंत्यत वाईट आहे. काही महिन्यांपूर्वी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या अशा प्रकारच्या लुबाडणूकीबाबत आंदोलने केली होती. परंतु त्यानंतरही असे प्रवास सुरूच आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे अधिकाऱ्यांचे कक्ष या स्वच्छतागृहापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यानंतरही पैसे आकारले जात असल्याने तक्रारी कोणाकडे कराव्यात असा प्रश्न प्रवाशांना निर्माण झाला आहे.

स्वच्छतागृहात नियमाव्यतिरिक्त पैसे घेतले जात असतील किंवा अशी तक्रार आल्यास दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल. -पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

स्वच्छतागृहात प्रवाशांची लुबाडणूक सुरू आहे. या प्रकारावर कोणताही आळा बसलेला नाही. जाब विचारल्यास कंत्राटदाराचे कर्मचारी देखील असभ्यपणे प्रवाशांसोबत वर्तन करतात. -राकेश कर्णुक, प्रवासी.