अंबरनाथ : प्रदूषणामुळे वादात सापडलेला मुंबईतील गोवंडी आणि देवनार परिसरातील जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच अंबरनाथजवळ स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र औद्याोगिक विभागाकडे या प्रकल्पासाठी अंबरनाथच्या जांभिवलीतील औद्याोगिक वसाहतीत भूखंड देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील वाशिवलीतील वडगाव ग्रामपंचायतीत सुरू केला जाणार होता. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर तो अंबरनाथजवळ आणला जात आहे.

मुंबईतील गोवंडी आणि देवनार परिसरातील प्रदूषणाबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर असे प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी मे. ‘एसएमएस इन्वोक्लिन प्रायव्हेट लिमिटेड’ यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार जागा देण्याच्या हालचाली सुरू होत्या. जैविक कचरा ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची सेवा असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबईनजीकच्या परिसरात महामंडळामार्फत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Kalyan Dombivli Municipality on complaint of non collection of garbage
कल्याणमधील कचरा संकलनात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द, पालिकेकडून होणार ब, ड आणि जे प्रभागात सफाई

हेही वाचा…कल्याण-डोंबिवलीतील ११८ हेक्टर सरकारी जमिनीवर ८ हजार ५७३ बेकायदा बांधकामे

त्यानुसार संबंधित कंपनीला संयुक्त जैविक कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट सुविधेसाठी पाताळगंगा, बोरिवली-औद्याोगिक क्षेत्रातील भूखंड वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र वाशिवलीच्या ग्रुप ग्रामपंचायत, वडगाव तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि संघटना यांनी एमआयडीसीकडे तक्रार दाखल केली होती.

या प्रकल्पामुळे बोरिवली गाव, बोरिवली ठाकूरवाडी, कैरे, कैरे आदिवासीवाडी, शिवाजीनगर कैरे, वडगाव आणि इतर लगतच्या भागांत कचऱ्यापासून दुर्गंधी पसरण्याच्या भीतीने या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरात रोगराई वाढून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण होणार होते.

हेही वाचा…Thane Metro : ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील, सहा डब्यांच्या मेट्रोवर अखेर शिक्कामोर्तब

मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आणि धोकादायक असा प्रकल्प असल्याने याला विरोध करण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प रायगडमधून आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. जैविक कचरा प्रकल्पाच्या मानवी आरोग्यावरील घातक परिणामांचा कोणताही विचार करण्यात न आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विरोध होण्याची शक्यता

अंबरनाथ शहरातील औद्याोगिक वसाहतींमुळे आधीच प्रदूषणात वाढ झाली आहे. जल, वायू प्रदूषणामुळे नागरिकांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकल्पाला अंबरनाथमध्येही विरोध होण्याची शक्यता आहे. येथे यापूर्वी बृहन्मुंबई महापालिकेने कचरा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला, त्याला विरोध झाला होता.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच दादांचा जयघोष…. लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना राष्ट्रवादीत श्रेयाची चढाओढ

२३,७६३ चौरस मीटरचा भूखंड

अतिरिक्त अंबरनाथ औद्याोगिक वसाहतीतील जांभिवली फेज-४ यातील भूखंड क्र. जेबी-३३ हा २३,७६३ चौरस मीटरचा भूखंड या प्रकल्पासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र औद्याोगिक विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा मागणी केलेला भूखंड आरेखित भूखंड असून वाटपास उपलब्ध आहे, असा शेरा मंडळाने दिला आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील देवनार आणि गोवंडीचा जैविक कचरा प्रकल्प अंबरनाथमध्ये स्थलांतरित होईल.

Story img Loader